प्रतापसिंहनगरमध्ये पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:37 IST2021-02-14T04:37:00+5:302021-02-14T04:37:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : येथील प्रतापसिंहनगरमध्ये शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री बारा वाजता अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यावेळी रेकॉर्डवरील ...

प्रतापसिंहनगरमध्ये पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : येथील प्रतापसिंहनगरमध्ये शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री बारा वाजता अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यावेळी रेकॉर्डवरील १५ गुन्हेगारांसह ३०० घरे, झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन पोलिसांनी कसून चौकशी केली. यात २१ दुचाकी जप्त करण्यात आल्या.
प्रतापसिंहनगरमध्ये सतत काही ना काही वादावादीचे प्रसंग घडत असतात. जबरी चोरी, खून, लुटमारीच्या घटना या परिसरात यापूर्वी घडल्या आहेत. गुन्हेगारांना लपण्यासाठी हा परिसर ओळखला जातो. त्यामुळे शुक्रवारी रात्री अचानक पोलीस फौजफाटा प्रतापसिंहनगरात दाखल झाला. संशयितांची धरपकड करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान संशयित वाटणाऱ्या २१ दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या. या दुचाकी चोरीच्या आहेत की नाही, याबाबत चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अचानक पोलिसांची एन्ट्री झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले.
प्रतापसिंहनगर परिसरातच असलेल्या शासकीय इमारतींमध्ये असलेले साहित्य चोरीस जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या कारवाईमध्ये पोलिसांनी चोरीस गेलेले साहित्य जप्त केले आहे.
फोटो : 13 सातारा