शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएम जन-मन’ आणणार कातकरी समाजात समृद्धीची पहाट, सातारा जिल्हा परिषदेकडून सर्वेक्षण 

By नितीन काळेल | Updated: January 11, 2024 17:41 IST

जिल्ह्यातील ८४५ कुटुंबाना मूलभूत सुविधांचा लाभ 

सातारा : जिल्ह्यातील आदिम कातकरी समाजातील वंचित कुटुंबांत ‘प्रधानमंत्री जन मन’ योजनेच्या माध्यमातून समृद्धी फुलवण्याचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ८४५ कुटुंबांचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले आहे. आता त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत दि. १५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या लाभार्थ्यांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधणार आहेत हे विशेष.याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी माहिती दिली. त्यानुसार आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी जनजाती आदिवासी न्याय महाअभियान राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने प्राधान्यक्रमाने घेतला आहे. यासाठी गेल्यावर्षी १५ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री जनमन’ या अभियानाचा शुभारंभही करण्यात आला आहे. या अभियानादरम्यान सातारा जिल्ह्यात ९ तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ८४५ कातकरी कुटुंब वास्तव्यास असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे.या सर्वेक्षण झालेल्या कुटुंबांना आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, आयुष्यमान भारत, आरोग्य कार्ड, जातीचा दाखला, घरकुल, रस्ते, पिण्याचे पाणी आदी मूलभूत सेवा सुविधा पुरवण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासन अविरतपणे प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे.

दरम्यान, या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या जिल्ह्यातील ८४५ लाभधारक कुटुंबांशी दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रशासनाच्यावतीनेही मेढा, ता. जावली येथील एका मंगल कार्यालयात ऑनलाईन कार्यक्रमासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली. तसेच कार्यक्रमासाठी पात्र लाभधारक कुटुंबांनीही उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद