कोरोनाचा कहर रोखण्यासाठी विरवडेत प्रतिज्ञा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST2021-04-23T04:41:24+5:302021-04-23T04:41:24+5:30
ओगलेवाडी : कऱ्हाड तालुक्यातील विरवडे गावात आठवडाभरात २६ हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने, विरवडे ...

कोरोनाचा कहर रोखण्यासाठी विरवडेत प्रतिज्ञा!
ओगलेवाडी : कऱ्हाड तालुक्यातील विरवडे गावात आठवडाभरात २६ हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने, विरवडे ग्रामपंचायतीने कोरोनाचा कहर रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. संपूर्ण गाव सॅनिटाईज करण्यात येत आहेत. गावातील लहानांपासून वृद्धांपर्यंत चार हजार मास्कचे वाटप करण्यात आले आहे. तसेच कोरोना रोखण्यासाठी ग्रामस्थांना प्रतिज्ञा देण्यात आली.
जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने यांच्या उपस्थितीत गावात औषध फवारणीचे काम सुरू करण्यात आले. यावेळी सरपंच अर्चना मदने, उपसरपंच सागर हाके, राजन धोकटे, ग्रामपंचायत सदस्य शैलेंद्र कोल्हटकर, नितीन आवळे, संदीप लोंढे, तलाठी सुजित थोरात, ग्रामसेवक शिवाजी लाटे, पोलीसपाटील अमित वीर, आशा वैशाली मरगळे, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदाशिवगड विभागातील हजारमाची व ओगलेवाडीत कोरोनाचा कहर सुरू आहे. ओगलेवाडीला लागूनच असलेल्या विरवडे गावातही मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळत आहेत. विरवडेतील २६ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, तर गेल्या आठवडाभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विरवडे ग्रामपंचायत क्षेत्राचा विस्तार मोठा आहे. ओगलेवाडीची जवळपास अर्धी बाजारपेठ विरवडे हद्दीत येते. ओगलेवाडी भाजी मंडई विरवडे हद्दीत भरते, तर करवडी फाट्यापासून ते ओगलेवाडी चौकापर्यंतच्या रस्त्याची पश्चिम बाजू व एमएसईबी रोडची उत्तर बाजू विरवडे हद्दीत येते. याच भागात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.
कोरोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी विरवडे ग्रामपंचायतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
(चौकट)
ग्रामपंचायतीचे सर्वतोपरी प्रयत्न..
ग्रामपंचायतीने संपूर्ण गावाचे सॅनिटायजिंग करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच गावातील लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व ग्रामस्थांना ४ हजार मास्कचे वाटप केले आहे. गावातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन सागर शिवदास व चंद्रकांत मदने यांनी दिले.
२२विरमाडे
विरमाडे येथे औषध फवारणी प्रारंभप्रसंगी सागर शिवदास, चंद्रकांत मदने, अर्चना मदने, सागर हाके, राजन धोकटे आदी उपस्थित होते.