सातारा : आपण एकमेकांना पूर्वीपासूनच ओळखतो आणि एकमेकांना चांगले ओळखूनही आहोत. लोकसभा निवडणुकीमध्ये मला तुम्ही पळायला लावलं. मेहरबानी करा आता पळायला लावू नका, अशी मिश्किली उदयनराजे भोसले यांनी केली. साताऱ्यात झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या सातारा लोकसभा मतदारसंघ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले, जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज घोरपडे, ज्येष्ठ नेते दत्ताजी थोरात, महेश शिंदे, अविनाश फरांदे, भरत पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, सुवर्णा पाटील, नगराध्यक्षा माधवी कदम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कविता कचरे यांची प्रमुख उपस्थिती होती.उदयनराजे म्हणाले, निवडणुका आल्या की अफवांचा सुळसुळाट होतो, त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. माझे वेगवेगळ्या पक्षांमध्ये मित्र आहेत; पण मात्र मैत्री एवढ्यापुरतीच मर्यादित राहील. कृपा करून प्रत्येकाने जाणावं. माझ्या बरोबर आहेत ते माझ्या बरोबरच राहतील आणि जे नाही ते नाहीत. विधानसभेला ज्यांना उमेदवारी मिळेल, त्यांचा प्रचार मी करणार आहे.मागील लोकसभा निवडणुकीचा संदर्भ घेऊन उदयनराजे म्हणाले, मी इतर पक्षातून उमेदवार होतो. भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना तुम्ही भरपूर पळालात आणि मलाही भरपूर पळवलंत. त्यामुळे मेहरबानी करून मला आता पळायला लावू नका, माफ करा.
मेहरबानी करून मला आता पळायला लावू नका : उदयनराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 17:22 IST
आपण एकमेकांना पूर्वीपासूनच ओळखतो आणि एकमेकांना चांगले ओळखूनही आहोत. लोकसभा निवडणुकीमध्ये मला तुम्ही पळायला लावलं. मेहरबानी करा आता पळायला लावू नका, अशी मिश्किली उदयनराजे भोसले यांनी केली. साताऱ्यात झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या सातारा लोकसभा मतदारसंघ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
मेहरबानी करून मला आता पळायला लावू नका : उदयनराजे
ठळक मुद्देमेहरबानी करून मला आता पळायला लावू नका : उदयनराजेभाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली मिश्किली