प्लास्टीकपासून डांबर अन् मनोरंजक गणिती बॉक्स

By Admin | Updated: December 10, 2014 23:57 IST2014-12-10T21:42:58+5:302014-12-10T23:57:41+5:30

कातरखटावात विज्ञान प्रदर्शन : चिमुकल्यांची प्रतिभा बहरली

From the plastic to the tar and entertaining mathematical box | प्लास्टीकपासून डांबर अन् मनोरंजक गणिती बॉक्स

प्लास्टीकपासून डांबर अन् मनोरंजक गणिती बॉक्स

कातर खटाव : सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातील ४० वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ३ ते ५ या कालावधीत कात्रेश्वर हायस्कुल, कातरखटाव येथे पार पडले.
या प्रदर्शनास माध्यमिक मधुन चाळीस विद्यालयाने व प्राथमिकमधुन ५३ शाळांनी सहभाग घेतला होता. प्रदर्शन पाहण्यासाठी एकोण-चाळीस शाळांनी तालुक्यातून हजेरी लावली होती. यामध्ये एकूण दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
विज्ञान प्रदर्शनामध्ये टाकाऊ पदार्थ व प्लॅस्टीकपासून डांबर तयार करणे. हे उपकरण बनविलेल्या कुलकर्णी आदीत्य विद्याधर हुतात्मा परशुराम विद्यालय, वडूज या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक
पटकावला.
तर माध्यमिक शैक्षणिक साहित्य निर्मिती या बहुउद्देशीय सर्व सकल्पना उपयुक्त गणितीय उपकरणाला श्री. लिंगे. एस. जे. जयभवानी विद्यालय, पाचवड या विद्यालयाने पटकावला. द्वितीय क्रमांक प्राथ. शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मीतीमध्ये मनोरंजक गणिती बॉक्स श्री. धनंजय अनिल कुलकर्णी जि. प. शाळा वडगाव (ज.स्वा) व लोक संस्था शिक्षण माध्य-गटात प्रथम क्रमांक लोक संख्या विस्फोट, या प्रयोगासाठी अमर महादेव भागवत श्री. कात्रेश्वर हायस्कुल कातरखटावत तर प्राथमिक गटात ‘लेक वाचवा’ या प्रयोगासाठी रंजना सानप, श्रीमंत. जि. प. शाळा. माळीनगर (मायणी), या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.
जीवन सत्वे पोपटे भविष्य (मनारंजनातुन विज्ञान) या प्रयोगासाठी कदम गौरी राजेंद्र, ज. स्वा. विद्यामंदीर, वडगाव या शाळेने द्वितीय क्रमांक तर अंन्डर ग्राऊंड पार्किंग सिस्टीम या प्रयोगासाठी सावंत अनुराज भानुदास, सनराईज इंग्लिश खटाव,
या शाळेने तृतीय क्रमांक पटकावला. (वार्ताहर)

Web Title: From the plastic to the tar and entertaining mathematical box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.