सातारा शहर परिसरातील शाळांत प्लास्टिकमुक्तीला प्रारंभ : ‘कर्तव्य सोशल’चा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:19 AM2020-01-04T00:19:01+5:302020-01-04T00:20:28+5:30

कर्तव्य सोशल ग्रुप आणि सागर मित्र अभियान या सेवाभावी संस्थेमार्फत शहर परिसरातील शाळांना प्लास्टिकमुक्तीसाठी आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या नियोजनासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती.

Plastic relief started in schools in the city area | सातारा शहर परिसरातील शाळांत प्लास्टिकमुक्तीला प्रारंभ : ‘कर्तव्य सोशल’चा उपक्रम

सातारा शहर कचरामुक्त आणि प्लास्टिकमुक्त व्हावे, यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत.

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी घेतली शपथ, ७५ किलो प्लास्टिक कचरा गोळा

सातारा : शहर कचरामुक्त आणि प्लास्टिकमुक्त व्हावे, यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. मुलांना प्लास्टिक कचरा निर्मूलनाचा छंद जडावा, यासाठी कर्तव्य सोशल ग्रुप आणि सागर मित्र अभियान या सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांनी गोळा केलेला प्लास्टिक कचरा दर महिन्याच्या २ तारखेला उचलून त्याचे विघटन करण्यात येत आहे. गुरुवार, दि. २ रोजी तब्बल ७५ किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला असून, त्याचे विघटन करण्यात आले. दरम्यान, याप्रसंगी उपक्रमात सहभागी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कचरा निर्मूलनाची शपथ घेत उपक्रमाला प्रतिसाद दिला.

कर्तव्य सोशल ग्रुप आणि सागर मित्र अभियान या सेवाभावी संस्थेमार्फत शहर परिसरातील शाळांना प्लास्टिकमुक्तीसाठी आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या नियोजनासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीला लोकमंगल हायस्कूल नागेवाडी, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा, अजिंक्यतारा महाध्यमिक विद्यामंदिर शेंद्र्रे, भारत विद्यामंदिर संभाजीनगर, शाहूपुरी माध्यमिक विद्यालय, ज्ञानवर्धिनी हायस्कूल शाहूपुरी, इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल सातारा, नवीन मराठी शाळा, सुशिलादेवी साळुंखे हायस्कूल सातारा, सातारा इंग्लिश मीडियम स्कूल, अनंत इंग्लिश स्कूल, हिंदवी पब्लिक स्कूल, दातार इंग्लिश मीडियम स्कूल, डॉ. जे. आर. डब्ल्यू. आयरन अ‍ॅकॅडमी, अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक शाळा, छत्रपती शाहू अ‍ॅकॅडमी आदी शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी कचरा गोळा करून ठेवतील आणि हा कचरा कर्तव्य ग्रुपच्या वाहनातून नेऊन त्याचे विघटन केले जाईल.

 

  • कचरामुक्तीचा निर्धार..

कर्तव्य सोशल ग्रुप आणि सागर मित्र अभियान या सेवाभावी संस्थेमार्फत शहर परिसरातील शाळांना प्लास्टिकमुक्तीसाठी आवाहन करण्यात आले होते. यामध्ये अनेक शाळांनी या उपक्रमात ७५ किलो कचरा गोळा केला होता. गोळा झालेला कचरा कर्तव्य सोशल ग्रुपच्या वाहनात भरून विघटनासाठी नेण्यात आला. यावेळी प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्लास्टिकमुक्तीची शपथ घेऊन माझे घर, माझी शाळा कचरामुक्त करण्याचा निर्धार केला.


 

Web Title: Plastic relief started in schools in the city area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.