शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

पुणे-बेंगलोर महामार्गालगतच्या डोंगरभिंतींना प्लास्टर, काम वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 1:26 PM

पुणे-बेंगलोर महामार्गावर २४ जून रोजी झालेल्या जोरदार पावसात शेंद्रे येथे डोंगराचा भाग खचून दगड, मातीचा भाग सखल भागात साठला होता. याबाबत लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणाने गुरुवारपासून डोंगराच्या भिंतींना शॉक्रिट (प्लास्टर)चे काम हाती घेतले.

ठळक मुद्दे पुणे-बेंगलोर महामार्गालगतच्या डोंगरभिंतींना प्लास्टर, काम वेगातखिंडवाडीत दगड, माती कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर कार्यवाही

सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर २४ जून रोजी झालेल्या जोरदार पावसात शेंद्रे येथे डोंगराचा भाग खचून दगड, मातीचा भाग सखल भागात साठला होता. याबाबत लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणाने गुरुवारपासून डोंगराच्या भिंतींना शॉक्रिट (प्लास्टर)चे काम हाती घेतले.पुणे-बेंगलोर महामार्गावर शेंद्रे येथे रविवारी (दि. २४) झालेल्या जोरदार पावसाने डोंगरावरील दगड, धोंडे, माती येऊन साठली. सखल भागात पाणी साठल्याने अपघाताची शक्यता होती; परंतु महामार्ग प्राधिकरणाने रात्री उशिरापर्यंत मोहीम राबवून माती, दगडांचा खच बाजूला केला.

खिंडवाडी ते शेंद्रे मार्गातील डोंगरात दगडखाणी आहेत. या खाणींकडे जाणारे रस्ते तीव्र उताराचे तसेच कच्चे आहेत. तसेच महामार्गावर डोंगराच्या बाजूला मोठी भिंत नसल्याने जोरात पाऊस कोसळला तर डोंगराचे दगड, मुरूम तसेच रस्त्याची माती वाहून उताराने थेट महामार्गावरील सखल भागात येऊन साठते. रविवारी पावसाच्या जोरदार प्रवाहाबरोबर डोंगरउतारावरून दगड, धोंडे, माती शेंद्रे, ता. सातारा येथील महामार्गावर साठून राहिली होती. साठलेले पाणी आणि त्यात दगड, धोंडे आणि मातीचा जागोजागी ढिगारा पडला होता.दरम्यान, रुंदीकरण करत असताना महामार्गालगतच्या डोंगराचा भाग खचला आहे. त्यातच येथूनच खाणीकडे जाणाऱ्या वाटा तयार करण्यात आल्या आहेत. अनेकदा पाऊस पडल्यानंतर डोंगर खचून माती, दगड महामार्गावर कोसळतात. रविवारच्या पावसात असे दगड कोसळून ते सखल भागात साठल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. हे दगड वाहनांवर कोसळून जीविताचे नुकसान होऊ शकते, हे लक्षात घेऊन महामार्ग प्राधिकरणाने याठिकाणी असलेल्या डोंगराला प्लास्टर मारण्याचे काम सुरू केले आहे.

गुरुवारी खिंडवाडीत उतारालगत असणाऱ्या डोंगरावर हे काम सुरू होते. या कामासाठी मोठा जेसीबी वापरण्यात आला. डोंगराच्या भिंतीला कळकाचा मनोरा तयार केला होता. मशीनच्या साह्याने प्रेशरने डोंगरावर प्लास्टर मारण्याचे काम सुरू होते. यासाठी सिग्नल उभा करून महामार्गावरील वाहतूकही वळविण्यात आली होती.वाहनांचा वेग कमी ठेवण्याच्या सूचनाखिंडवाडीत मुख्य महामार्ग तसेच सेवा रस्त्यालगतच्या पुलालाही प्लास्टर मारण्याचे काम सुरू आहे. यासाठी महामार्ग प्राधिकरणाने सिग्नल उभा केला आहे. मात्र, हे काम करत असताना वाहनांचा वेग असायला हवा. अपघात टाळण्यासाठी प्रत्येक वाहनधारकाने काळजी घ्यायला हवी, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

टॅग्स :highwayमहामार्गSatara areaसातारा परिसर