सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर २४ जून रोजी झालेल्या जोरदार पावसात शेंद्रे येथे डोंगराचा भाग खचून दगड, मातीचा भाग सखल भागात साठला होता. याबाबत लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणाने गुरुवारपासून डोंगराच्या भिंतींना शॉक्रिट (प्लास्टर)चे काम हाती घेतले.पुणे-बेंगलोर महामार्गावर शेंद्रे येथे रविवारी (दि. २४) झालेल्या जोरदार पावसाने डोंगरावरील दगड, धोंडे, माती येऊन साठली. सखल भागात पाणी साठल्याने अपघाताची शक्यता होती; परंतु महामार्ग प्राधिकरणाने रात्री उशिरापर्यंत मोहीम राबवून माती, दगडांचा खच बाजूला केला.
गुरुवारी खिंडवाडीत उतारालगत असणाऱ्या डोंगरावर हे काम सुरू होते. या कामासाठी मोठा जेसीबी वापरण्यात आला. डोंगराच्या भिंतीला कळकाचा मनोरा तयार केला होता. मशीनच्या साह्याने प्रेशरने डोंगरावर प्लास्टर मारण्याचे काम सुरू होते. यासाठी सिग्नल उभा करून महामार्गावरील वाहतूकही वळविण्यात आली होती.वाहनांचा वेग कमी ठेवण्याच्या सूचनाखिंडवाडीत मुख्य महामार्ग तसेच सेवा रस्त्यालगतच्या पुलालाही प्लास्टर मारण्याचे काम सुरू आहे. यासाठी महामार्ग प्राधिकरणाने सिग्नल उभा केला आहे. मात्र, हे काम करत असताना वाहनांचा वेग असायला हवा. अपघात टाळण्यासाठी प्रत्येक वाहनधारकाने काळजी घ्यायला हवी, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.