निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संगोपन गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST2021-06-06T04:28:55+5:302021-06-06T04:28:55+5:30
वडूज : ‘तालुक्यातील जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी आणि जीवनातील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ...

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संगोपन गरजेचे
वडूज : ‘तालुक्यातील जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी आणि जीवनातील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे हीच काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांनी केले.
येथील नूतन पोलीस ठाणे परिसरात वृक्षारोपणप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डाॅ. कुंडलिक मांडवे, उपाध्यक्ष मुन्ना मुल्ला, डॉ. प्रवीण चव्हाण, अभय देशमुख, राजेंद्र पवार, डॉ. संतोष देशमुख, रोहित शहा, संतोष देशमाने, विशाल भागवत आदीची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मांडवे म्हणाले, ‘कोरोना महामारीच्या काळात मानवाला निसर्गाचे महत्त्व समजले असून, आपापली जबाबदारी मानवाने ओळखून दवाखान्यापेक्षा निसर्गातील प्राणवायू अंत्यत महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशी झाडे उपयोगी व फल आहारासाठी शरीराला उपयुक्त ठरत आहेत. प्राणवायू देणे हा प्रत्येक झाडाचा गुणधर्म असला तरी इतर भागांमधून अनेक जीवसृष्टीला वाचविण्याचे काम ही देशी झाडे करत असतात.’
यावेळी पोलीस हवालदार राहुल सरतापे, प्रसाद जगदाळे, अनिकेत कुंभार, चेतन गोडसे, अक्षय कुंभार, अलोक महाजन, मनोज कुंभार, अभिजित कर्पे, जितेंद्र पोतदार, कौशिक भागवत, प्रयास संस्थेचे सदस्य व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
चौकट
प्रयासचा ध्यास ...
संस्थेच्या माध्यमातून प्लॅस्टिक समस्येवर उपाय म्हणून इकोब्रेक्स संकल्पना सुरू केली. प्लॅस्टिक कचरा व ई-कचरा संकलन केंद्र सुरू करून नर्सरीच्या माध्यमातून एक किलो प्लॅस्टिक कचरा दिल्यानंतर एक देशी झाडाचे रोप मोफत, असा उपक्रम हाती घेतला आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व येथील लोकांचे जीवनमान निरोगी राहण्यासाठी एकप्रकारे प्रयास संस्थेने ध्यासच घेतला आहे.
फोटो ..
०५वडूज
वडूज येथील नूतन पोलीस ठाणे परिसरात वृक्षारोपण करताना पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर व प्रयास संस्थेचे सदस्य उपस्थित होते. ( शेखर जाधव )
-----------------------------------