डॉक्टर्स दिनानिमित्त पिंपळबन येथे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:24 IST2021-07-03T04:24:34+5:302021-07-03T04:24:34+5:30

कुडाळ : कुडाळ येथील पिंपळबनामध्ये गावातील सर्व मान्यवर डॉक्टर व मेडिकल व्यावसायिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सर्व ...

Plantation at Pimpalban on the occasion of Doctors' Day | डॉक्टर्स दिनानिमित्त पिंपळबन येथे वृक्षारोपण

डॉक्टर्स दिनानिमित्त पिंपळबन येथे वृक्षारोपण

कुडाळ : कुडाळ येथील पिंपळबनामध्ये गावातील सर्व मान्यवर डॉक्टर व मेडिकल व्यावसायिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सर्व डॉक्टर्स मंडळींकडून पिंपळाबनचे कौतुक करीत योग्य त्या प्रकारे सहकार्य करण्याची भावना व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सर्व वैद्यकीय व्यवसायात काम करणारे अनेक लोक हे अतिशय चांगल्या पद्धतीने व प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णसेवेचे काम करीत आहेत, तरी त्यांच्या पाठीमागे समाज म्हणून सर्व तरुण व ग्रामस्थ यांनीही उपस्थित खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी डॉ. प्रमोद जंगम, डॉ. अमोल गायकवाड, डॉ. राजेंद्र भोईटे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. द्विवेदी त्याचबरोबर मेडिकल व्यावसायिक अरुण जगदाळे यासह पिंपळबन सदस्य उपस्थित होते.

०२कुडाळ

फोटो: डॉक्टर्स दिनाच्या निमित्ताने पिंपळबन येथे कुडाळमधील डॉक्टरांनी वृक्षारोपण केले.

Web Title: Plantation at Pimpalban on the occasion of Doctors' Day