वृक्षारोपण व संवर्धन ही आपली नैतिक जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST2021-06-06T04:28:54+5:302021-06-06T04:28:54+5:30
मायणी : ‘दुष्काळी भागातील ग्रामस्थांनी दुष्काळावर मात करण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावणे गरजेचे ...

वृक्षारोपण व संवर्धन ही आपली नैतिक जबाबदारी
मायणी : ‘दुष्काळी भागातील ग्रामस्थांनी दुष्काळावर मात करण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावणे गरजेचे आहे. वृक्षारोपणाबरोबरच त्या वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करणे काळाची व आपली गरज आहे,’ असे प्रतिपादन मायणी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी केले.
पंढरपूर-मल्हारपेठ राज्यमार्गाच्या मायणी-चितळी मार्गाच्या दोन्ही बाजूस पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या अनुषंगाने ५ जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रतिवर्षी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या फ्रेंड्स ग्रुपच्यावतीने मायणी परिसरातील विविध भागांत वृक्षारोपण केले जाते. याही वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व प्रकारचे नियम व अटी शर्तींचे पालन करून हा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी उंबर, करंज, लिंब या प्रकारच्या अकरा झाडांची रोपे लावण्यात आली. यासाठी मायणी वनविभागाचे सहकार्य मिळाले. यावेळी फ्रेंडस ग्रुपचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य व पोलीस पाटील प्रशांत कोळी, हवालदार प्रवीण सानप, किरण भिसे, संस्कार जाधव, अनंत जाधव आदी उपस्थित होते.
०५मायणी
मायणी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करताना शहाजी गोसावी व फ्रेंड्स ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.(छाया : संदीप कुंभार)