पळसावडेमध्ये कृषिदूताकडून वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:28 IST2021-07-18T04:28:08+5:302021-07-18T04:28:08+5:30
म्हसवड : सध्या शैक्षणिक क्षेत्रातून एक चांगली ऊर्जा घेऊनच विद्यार्थी यशस्वी होत आहेत. आपल्या जन्मभूमीसाठी, सामाजिक बांधीलकी म्हणून काहीतरी ...

पळसावडेमध्ये कृषिदूताकडून वृक्षारोपण
म्हसवड : सध्या शैक्षणिक क्षेत्रातून एक चांगली ऊर्जा घेऊनच विद्यार्थी यशस्वी होत आहेत. आपल्या जन्मभूमीसाठी, सामाजिक बांधीलकी म्हणून काहीतरी चांगले काम करण्यासाठी धडपड करीत आहेत. आपल्या गावातील बारामतीच्या कृषी महाविद्यालयांत चतुर्थ वर्षात शिक्षण घेणारे सूरज सुभाष लवटेे हे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गावातील तरुण, युवकांना बरोबर घेऊन गावामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवत आहेत.
सध्या शैक्षणिक क्षेत्रातून एक चांगली ऊर्जा घेऊनच विद्यार्थी यशस्वी होत आहेत व आपल्या मायभूमीसाठी सामाजिक बांधीलकी म्हणून काहीतरी चांगले काम करण्यासाठी धडपड करीत आहेत. वृक्षारोपण ही सध्या काळाची गरज आहे. या युवकांचे हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे उद्गार वृक्षारोपणाच्या प्रारंभी पळसावडेचे उपसरपंच सागर काळे यांनी काढले.
यावेळी पोलीस पाटील शामराव काळे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय यादव, धीरज शेंडगे, सिद्धनाथ शेंडगे आदी गावातील ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
170721\img-20210717-wa0020.jpg
नूतन पधधिकारी सत्कार