शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागात निर्यातक्षम फळबागा होणार, एआय तंत्रज्ञान वापरणार; कृषी विभागाची तयारी

By नितीन काळेल | Updated: February 13, 2025 16:29 IST

सातारा जिल्हा महाराष्ट्राचं फ्रूट बास्केट म्हणून येतोय पुढं

नितीन काळेलसातारा : सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी माण, खटाव तालुक्यात उरमोडी आणि जिहे कटापूर योजनेचे पाणी पोहोचत आहे. अशा ठिकाणी जवळपास ७ हजार हेक्टरवर निर्यातक्षम फळबागांचे नियोजन आहे. यासाठी राज्य कृषी विभागाने पूर्ण तयारी केली आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.सातारा जिल्हा महाराष्ट्राचं फ्रूट बास्केट म्हणून पुढे येत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४० प्रकारची विविध फळे घेण्यात येतात. अशी सर्व पार्श्वभूमी असल्याने जिल्ह्यात फळबागांचा विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी राज्य कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनातून माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात नवीन फळबाग लागवडीचा प्रकल्प होत आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण, खटाव तालुक्यात उरमोडी आणि जिहे कटापूर योजनेचे पाणी पोहोचत आहे. जवळपास ७० हजार हेक्टर क्षेत्र या योजनेतून ओलिताखाली येणार आहे. या लाभक्षेत्रातच निर्यातक्षम फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कृषी विभागाने पूर्ण तयारी केली आहे.यासाठी शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, रोजगार हमी योजनेतून फळबाग, मागेल त्याला शेततळे आणि सुक्ष्म सिंचन योजनेचे एकत्रीकरण करून लाभ देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. तसेच काही वर्षातच दुष्काळी तालुक्यातील माळरानावर निर्यातक्षम फळबागा डोलताना दिसणार आहेत.

१२५ गावात राबविण्यात येणारकृषी विभागाच्या माध्यमातून माण, खटाव आणि कोरेगाव या तीन तालुक्यातील सुमारे १२५ गावांत या फळबागा होणार आहेत. यासाठी एआय या तंत्रज्ञानाचाही काही प्रमाणात वापर करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी २०० प्रशिक्षणे प्रस्तावितसातारा जिल्ह्यातून द्राक्षे आणि डाळिंबाची निर्यात होत आहे. त्याचबरोबर या योजनेत आंबा, आवळा, सीताफळ, पेरू, डाळिंब, द्राक्षे या मुख्य फळबागा योजनेतून घेण्यात येणार आहेत. याची फळेही उच्च दर्जाची मिळणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुमारे २०० प्रशिक्षणे प्रस्तावित आहेत. याची लागवड पावसाळ्यात करण्याचे नियोजन आहे. भविष्यात या बागा सेंद्रिय प्रमाणाखालीही आणण्यात येणार आहेत.

फळबागांचे असे नियोजन..

  • माण तालुका ३,५०० हेक्टर
  • खटाव ३,००० हेक्टर
  • कोरेगाव ५०० हेक्टर

सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात उरमोडी आणि जिहे कटापूर योजनेचे पाणी जात आहे. याच्या लाभक्षेत्रात निर्यातक्षम फळबागा घेण्याचे नियोजन झाले आहे. जवळपास ७ हजार हेक्टरवर या बागा असणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. या फळबागांमधून शेतकऱ्यांचा आर्थिक स्रोत आणखी भक्कम होणार आहे. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAgriculture Sectorशेती क्षेत्रAgriculture Schemeकृषी योजनाFarmerशेतकरी