शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Satara crime: बोगस पोलिसाकडे आढळले पिस्टलचे राऊंड, वाहने अडवून करत होता कागदपत्रांची तपासणी

By नितीन काळेल | Updated: June 22, 2023 13:01 IST

सातारा : सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर पोलिसांचा वेश घालून वाहनांची कागदपत्रे तपासणाऱ्या तरुणाचा पोलिसांनी बुरखा फाडला. संबंधित तरुण सातारारोडचा ...

सातारा : सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर पोलिसांचा वेश घालून वाहनांची कागदपत्रे तपासणाऱ्या तरुणाचा पोलिसांनी बुरखा फाडला. संबंधित तरुण सातारारोडचा असून त्याच्याकडे पिस्टलचे राऊंडस् मिळून आले. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सातारा वाहतूक नियंत्रण शाखेतील हवालदार श्रीकांत निकम (रा. बोरखळ, ता. सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनंतर सुनील संजय राऊत (वय २४, रा. सातारारोड, ता. कोरेगाव) याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.पोलिसांनी सांगितले की, दि. २१ जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सुनील राऊत हा सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाहेर पोलिसाच्या वेशात आढळून आला. त्यावेळी तो पोलिस असल्याची बतावणी करुन लोकांची वाहने अडवत होता. तसेच संबंधित गाड्यांच्या कागदपत्रांची मागणी करत असल्याचे दिसून आले.संशय आल्याने त्याची माहिती घेतली असताना तो पोलिस असल्याचे भासवत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच अंगाची झडती घेतल्यावर त्याच्या कमरेला बांधलेल्या बेंडरोलमध्ये पिस्टलचे राऊंड आढळून आले.याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुनील राऊत याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस अधिक माहिती घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस