एसटीअभावी नाटोशीतील विद्यार्थ्यांची पायपिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST2021-01-08T06:04:36+5:302021-01-08T06:04:36+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने सर्वच शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जसा कोरोना प्रादुर्भाव कमी झाला, तशा ...

एसटीअभावी नाटोशीतील विद्यार्थ्यांची पायपिट
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने सर्वच शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जसा कोरोना प्रादुर्भाव कमी झाला, तशा टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येत आहेत. पाटण तालुक्यात सध्या नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र शाळेच्या वेळेत एसटी नसल्याने विद्यार्थ्यांना चालत शाळेत जावे लागत आहे. शाळेच्या वेळेत सकाळी ७ वाजता आणि ८ वाजता नाटोशी ते पाटण एसटी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
नाटोशी येथून कुसरूंड, मोरगिरी आणि पाटण येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, नाटोशी येथे वेळेत एसटी येत नसल्याने मन:स्ताप सहन करत मुलांना आणि ग्रामस्थांना चालत प्रवास करावा लागत आहे. तरी एसटी प्रशासनाने शाळा आणि कॉलेजच्या वेळा लक्षात घेऊन वेळेत बदल करावा, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने उपसरपंच उदय देसाई यांनी केली आहे.