शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

‘पाईल्स’आडून ‘कॅन्सर’चा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:58 PM

प्रगती जाधव-पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मुळव्याध या आजाराविषयी समाजात असलेल्या संकोचामुळे याबाबत बोलणं किंवा औषधोपचार टाळणाऱ्यांची ...

प्रगती जाधव-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मुळव्याध या आजाराविषयी समाजात असलेल्या संकोचामुळे याबाबत बोलणं किंवा औषधोपचार टाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, पाईल्स आहे, असे समजून घरगुती उपाय करणाºया काही रुग्णांना कर्करोग असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. मुळव्याध आणि कर्करोग यांच्या लक्षणात साम्य असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.बदलती जीवनशैली, तंतुमय पदार्थांचा आहारातील अल्प समावेश आणि जंक फूडमुळे कोलमडलेली पचनक्रिया या सर्व बाबी मुळव्याधीला आमंत्रण देणाºया आहेत. त्यामुळे पोट साफ झाले नाही तर मुळव्याधाचा त्रास उद्भवण्याची शक्यता असते, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. मात्र, शंभरातील अवघ्या १० टक्के रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो आणि उर्वरित रुग्णांना केवळ आहार, व्यायाम आणि पोट साफसाठी काही औषधे देऊन मुळव्याधावर उपाय करता येत असल्याचे अनेकांना माहितीच नाही.मुळव्याधीचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो. मात्र याविषयी खुलेपणाने कोणाशीच काहीच न बोलण्याची त्यांची मानसिकता असते. त्यामुळे घरगुती औषधे आणि उपाय करून महिला अगदी शेवटच्या क्षणाला याच्या निदानासाठी वैद्यकीय तज्ज्ञांकडे जातात. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले असल्यामुळे महिलांना अशक्तपणा, रक्त पडून अ‍ॅनिमिया, रक्तक्षय आदी आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते.पूर्वी पौष्टिक अन्नाच्या अभावामुळे महिलांमध्ये अ‍ॅनेमिया होण्याची संख्या जास्त होती. आता पुरेसा आणि पोषक आहार मिळूनही महिलांमध्ये अ‍ॅनेमिया होण्याचे मुळव्याध हे एक कारण बनू पाहत आहे. वारंवार रक्त पडल्यामुळे काही महिलांमध्ये रक्तक्षयची लक्षणेही वाढीव दिसू लागली आहेत. शरीरातील रक्त कमी होत असल्यामुळे महिलांमध्ये हे आजारही आढळत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. मुळव्याधाचा आजाराविषयी समाजात अजूनही संकोच आहे. याचे खास दवाखाने आणि वैद्यकीय तज्ज्ञ आहेत, हेच अनेक सामान्यांना माहिती नाही. त्यामुळे विना शस्त्रक्रिया मुळव्याध बरा करून देतो, असे सांगून गच्चम फी आकारणारे अशिक्षित वैद्य ग्रामीण भागात सक्रिय आहेत. विशेष म्हणजे रुग्ण आणल्यानंतर त्यांना कमिशन देणारे महाभागही या भागात पाहायला मिळतात.या आजाराच्या बाजारीकरणाविषयी बोलताना नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर भोंदूचे एजंट म्हणाले, ‘मुळव्याधग्रस्त रुग्णांना विनाशस्त्रक्रिया आजार बरा करण्याचे आमिष भोंदू वैद्यकीय बुवांच्या एजंटांकडून दाखवतात. त्यामुळे रुग्ण त्यांच्या भूलथापांना बळी पडतात. आपल्याला होणारा त्रास आणि त्यात शस्त्रक्रिया हे व्याप नको म्हणून सर्वसामान्य रुग्ण नातेवाइकांसह शस्त्रक्रियेला पोहोचतातही. तिथे गेल्यानंतर रक्ताचा एक थेंबही न पाडता आणि वेदनाविरहित पद्धतीने ‘कोंब’ काढल्याचे डॉक्टर सांगतात. काही उत्साही नातेवाईक ‘कोंब’ दाखवा, असेही म्हणतात. कोणत्याही मांसाचा एक छोटासा तुकडा दाखवून हे भोंदू रुग्णासह नातेवाइकांना फसवतात. प्रत्येक शस्त्रक्रियेमागे एका एजंटाला सरासरी पाच ते सात हजार रुपयांचे कमिशन मिळते.’ साताºयात गेल्या दहा वर्षांत मुळव्याध झालेल्या रुग्णांचा संकोच दूर झाल्यामुळे उपचारासाठी येणाºयांची संख्या वाढली आहे. मध्यमवयीन पुरुष, ज्येष्ठ आणि महिला रुग्णांची संख्या मोठी आहे. महिन्याला हजार रुग्ण तपासल्यानंतर त्यातील ३० ते ४० रुग्णांवरच शस्त्रक्रिया करण्यात येते.महिन्याला ४ ते ५ कॅन्सर रुग्णांची भर...मुळव्याध हा बरा होणार आजार आहे, त्यामुळे हा त्रास होणारे रुग्ण गरम पाण्यात तूप टाकून पिणे, सब्जा, दही, ताक यासारख्या शीत पदार्थांचा आहारात समावेश करण्याकडे भर देतात. हे उपाय करूनही उपयोग झाला नाही तर मेडिकलमधून मिळणाºया औषधांचा आधार घेतात. त्यातूनही बरं नाही वाटलं तर मग वैद्यकीय सल्ला घेण्यात येतो. मात्र, मुळव्याध झाले असे समजून स्वत:च्या शरीरावर प्रयोग करून घेत असताना रुग्ण सुप्तपणे कर्करोग वाढवत असतात, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. सर्व प्रयोग केल्यानंतर रुग्ण जेव्हा मुळव्याध विकार तज्ज्ञांकडे पोहोचतो तेव्हा उशीर झालेला असतो. दर महिन्याला एका दवाखान्यातून सरासरी ४ ते ५ रुग्णांमध्ये कर्करोग आढळतो.