शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खाकी वर्दीतील संजय देशमानेंची चित्रं अधीक्षकांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:46 IST

सातारा : पोलीस दलात कर्तव्य बजावत असताना अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाच्या ताणामुळे आपल्या आवडी-निवडी अन् छंद जपता येत नाहीत. मात्र, सातारा पोलीस दलातील हवालदार संजय देशमाने अपवाद आहेत. त्यांनी आपली चित्रकलेची आवड नुसती जोपासली नाही तर त्यांनी आपण काढलेल्या चित्रकलेत जीव ओतला. त्यामुळे त्यांनी काढलेली अनेक चित्रेही पोलीस ...

सातारा : पोलीस दलात कर्तव्य बजावत असताना अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाच्या ताणामुळे आपल्या आवडी-निवडी अन् छंद जपता येत नाहीत. मात्र, सातारा पोलीस दलातील हवालदार संजय देशमाने अपवाद आहेत. त्यांनी आपली चित्रकलेची आवड नुसती जोपासली नाही तर त्यांनी आपण काढलेल्या चित्रकलेत जीव ओतला. त्यामुळे त्यांनी काढलेली अनेक चित्रेही पोलीस अधीक्षकांच्या दालनाची शोभा वाढवत आहेत. या आता दालनात नूतन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख बसणार आहेत.सातारा पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागात संजय देशमाने चालक म्हणून काम करतात. त्यांची जनरल ड्यूटी असते. त्यामध्ये स्कॉट, पीसीआर आणि बंदोबस्तातील वाहने चालवण्याची जबाबदारी असते. त्यांचे काम म्हणजे अचानक आणि बेभरवसी असेच असते. व्हीआयपी, मंत्री आणि प्रशासकीय अधिकाºयांचे दौरे यासाठी गाडी घेऊन धावावे लागत असते. त्यातही कॅनव्हासमधील छोटी-मोठी ५० ते ६० तैलचित्रे काढली आहेत.त्यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड आहे. त्यांनी आपले शिक्षण करत असताना चित्रकलेची आवड जोपसली. पोलीस खात्यामध्ये ज्या-ज्या ठिकाणी बदली होईल त्या ठिकाणी आपले काम प्रामाणिकपणे करत असताना मिळेल त्या वेळेला त्यांनी व्यक्ती, ऐतिहासिक, पौराणिक आणि निसर्ग चित्र काढण्यात आपला वेळ खर्ची केला.देशमाने यांनी आतापर्यंत पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग, अतिरिक्त पोलीस महासंचालक लक्ष्मीनारायण, विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश मेकला, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना, जय जाधव, अमोल तांबे, आदी पोलीस अधिकाºयांची कॅनव्हासवरील तैलचित्रे काढून त्यांना भेट दिली आहेत.शिवराज्यभिषेक तैलचित्र ठरला अधिक आकर्षक..तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्यांनी पोलीस मुख्यालय आणि त्याच्यासमोर संचलन करणारे तैलचित्र काढले होते. त्यानंतर संदीप पाटील यांनी शिवराज्यभिषेक सोहळ्याचे चित्र काढण्यास सांगितले. देशमाने यांनी काढलेले तैलचित्र पाटील यांना आवडल्याने त्यांनी आपल्या दालनात लावले आहे.मुख्यालयाचे तैलचित्र पोलिसांच्या शिल्डवरसंजय देशमाने यांनी पोलीस मुख्यालय आणि त्यासमोर पोलिसांचे संचलन हे चित्र तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी इतके आवडले की त्यांनी सातारा पोलीस दलाच्या सर्व शिल्डवर तेच चित्र वापरले जाते.