बालचमूंच्या कुंचल्यातून साकारली चित्रे

By Admin | Updated: September 15, 2014 23:25 IST2014-09-15T21:31:18+5:302014-09-15T23:25:37+5:30

चित्रकला स्पर्धा : विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; चित्रांतून दिला सामाजिक संदेश

Pictures made from children's hair | बालचमूंच्या कुंचल्यातून साकारली चित्रे

बालचमूंच्या कुंचल्यातून साकारली चित्रे

कऱ्हाड : गुरुकुल प्री-स्कूल आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेला बालचमूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘लोकमत बालविकास मंच’ माध्यम प्रायोजक होते. नगरपालिका शाळा क्र. ३ मध्ये आयोजित चित्रकला स्पर्धेमध्ये सकाळी एक वाजल्यापासूनच मुलांसोबत पालकांनी हजेरी लावली. बाराशे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. वेगवेगळ्या गटातील बालचमूंनी आपल्या अफाट कल्पनाशक्तीने अतिशय सुंदर चित्रे रेखाटली होती. भले-भले लोक त्यांच्या कल्पनाशक्तीच्या मागे पडतील, अशी कल्पकता मुलांमध्ये असते, हे यानिमित्ताने समोर आले.
या स्पर्धेसाठी मुलांबरोबर पालकही तेवढ्याच उत्साहाने आले होते. लहान गटामध्ये मुलांना देण्यात आलेल्या ‘छोटा भीम’ या चित्रामध्ये वेगवेगळे आकर्षक रंग भरून बालचमूंही रंगामध्ये रंगून गेले होते. द्वितीय गटामध्ये चित्रमर्यादा नसल्यामुळे कोणी निसर्गचित्र, तर कोणी आकाशातील तारे, तर कोणी पऱ्यांची दुनिया चित्राच्या माध्यमातून सत्यात आणली. तृतीय गटामध्ये माझ्या स्वप्नातले घर साकारताना कोणी राजवाडा, तर कोणी खेडे गावातील झाडे-झुडपांमध्ये नटलेले घर काढले. अनेकांना शहरामधील घरांचे आकर्षण या निमित्ताने दाखवून दिले. समुद्रकिनारी एक छोटी झोपडी बांधून राहावे आणि या धावपळीच्या जीवनातून मुक्त व्हावे, असा संदेश काहीनी दिला. स्त्रीभ्रूणहत्या करू नये, म्हणून चित्रामधून मुलींनी संदेश दिला. या स्पर्धेच्या रूपाने आज आधुनिक युगातील मुले आपल्या आयुष्यात काय रंग भरतात, हे समोर आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण नगरपालिका शाळा नं. ३ चे मुख्याध्यापक अर्जुन कोळी, गुरुकुल स्कूलचे चेअरमन अजित डांगे आणि स्पर्धेचे परीक्षक मिलिंद पाटील, अमोल गवळी यांच्या हस्ते झाले. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ड्रॉइंग किट देऊन गौरविण्यात
आले. (प्रतिनिधी)

विजेते स्पर्धक
लहान गट :
जिया पासद, आदिती पोरे, यासी मुथा, वेदिका ढाणे, तेजस हजारे, पायल शहा, स्वरांजली जगदाळे
मध्यम गट
राजनंदिनी कांबळे, विनीत जैन, प्रतीक यादव, संकेत मनियार, साईनाथ जाधव, वैष्णवी शहाणे, सार्थक भोई
मोठा गट
जैना भंडारी, साहिल जैन, मारुती जाधव, श्रध्दा माने, शिवानी खटावकर, वेदांत लोहार, तुळशी माटेकर

कार्यक्रम ठिकाणी ‘बालविकास मंच’ सभासद नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुलांबरोबर पालकांनीही यामध्ये सहभाग नोंदवला.
फक्त १५० रूपये वार्षिक सभासद नोंदणी शुल्क भरून २५४ रुपये किमतीच्या भेटवस्तू, लकी ड्रॉ मध्ये सहभागी आणि ‘छोटा भीम’ला भेटण्याची संधी यानिमित्ताने मुलांना मिळत आहे.
आजच सभासद होवून ‘छोटा भीम’ बालनाट्याचे पास मोफत मिळवावेत, असे आवाहन ‘लोकमत बालविकास मंच’तर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Pictures made from children's hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.