कारखाना निवडणुकीचे चित्र आज होणार स्पष्ट
By Admin | Updated: April 15, 2015 00:43 IST2015-04-15T00:21:38+5:302015-04-15T00:43:39+5:30
परळी : येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना संचालक पदाच्या वीस जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीचे चित्र बुधवारी स्पष्ट होणार आहे.

कारखाना निवडणुकीचे चित्र आज होणार स्पष्ट
परळी : येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना संचालक पदाच्या वीस जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीचे चित्र बुधवारी स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वीस जागांसाठी १०० जण आखाड्यात आहेत. २६ एप्रिल रोजी मतदान होत असून पालकमंत्री पंकजा मुंडे, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचे पॅनल आमनेसामने आहेत. सोमवारी २३ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले तर यापूर्वी एका उमेदवाराने माघार घेतलेली आहे. त्यामुळे आता केवळ ७६ जण मैदानात आहेत. शेवटच्या दिवशी किती जण अर्ज मागे घेतात यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे. (वार्ताहर)
पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी कारखान्यासाठी प्रतिष्ठापणाला लावली आहे. दोघांनीही प्रचार यंत्रणेचा रिमोट स्वत:कडे ठेवला आहे. ते दोघेही परळीत तळ ठोकून आहेत.