पुसेगावात व्यावसायिकांकडून माणुसकीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:03 IST2021-05-05T05:03:41+5:302021-05-05T05:03:41+5:30
पुसेगाव : लॉकडाऊन काळात व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुकान उघडलं तरच घर चालणार, अशी ...

पुसेगावात व्यावसायिकांकडून माणुसकीचे दर्शन
पुसेगाव : लॉकडाऊन काळात व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुकान उघडलं तरच घर चालणार, अशी अवस्था असताना देखील पुसेगाव (ता. खटाव) येथील फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणाऱ्या सहाजणांनी आपल्या दुकानातील नऊ ऑक्सिजन सिलिंडर शासनाला देऊन खऱ्याअर्थाने माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
पुसेगाव हे खटाव तालुक्यातील मुख्य बाजारपेठेचे गाव. येथील कोविड केअर सेंटरमध्ये परिसरातील बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, सध्या ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याने रुग्णांबरोबरच उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशातच तहसीलदार किरण जमदाडे यांच्या भावनिक आवाहनास साद घालत पुसेगाव येथील कृष्णा ॲग्रो एजन्सीचे निखिल पोरे, महात्मा फुले वेल्डिंगचे चंद्रकांत गोरे, धनवान फॅब्रिकेशनचे आप्पाजी आईंगळे, सेवागिरी फॅब्रिकेशनचे प्रवीण नौगण, सद्गुरू कृपा फॅब्रिकेशनचे शिवाजी लोहार, ‘गुरुप्रसाद’चे केशव सूर्यवंशी, ‘शिवशंभू’चे संजय काटकर, जय हनुमान वेल्डिंगचे गणेश जाधव यांनी त्यांचे काम बंद ठेवत नऊ ऑक्सिजन सिलिंडर तलाठी गणेश बोबडे यांच्याकडे सुपूर्द केले. या व्यावसायिकांचे परिसरात सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.