चक्क फलटण पोलीस ठाण्यासमोरच मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2016 00:34 IST2016-01-17T00:04:47+5:302016-01-17T00:34:45+5:30

हॉटेल तोडफोड : १५ जणांवर गुन्हा दाखल

The Phatton police beat up in front of the police station | चक्क फलटण पोलीस ठाण्यासमोरच मारहाण

चक्क फलटण पोलीस ठाण्यासमोरच मारहाण

फलटण : फलटण शहरातील जिंती नाका येथे किरकोळ कारणावरून हॉटेलमधील खुर्च्या व पानटपरीची तोडफोड करण्यात आली. यावेळी झालेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले असून, त्यातील एकाला चक्क पोलीस ठाण्यासमोरच मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पंधरा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, रमेश अशोक घोलप (वय २८, रा. मलठण) यांचे जिंती नाका येथे हॉटेल आहे. या हॉटेलवर किरकोळ कारणावरून सोमवार पेठेतील राहुल पवार, रमेश पवार, रोहन पवार व इतर दहा ते पंधराजणांनी दगडफेक करून खुर्च्यांची मोडतोड केली. फिर्यादी रमेश घोलप यांचा चुलतभाऊ रवी रामचंद्र घोलप याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हॉटेलजवळील निखिल अंकुश जाधव याच्या पानटपरीचीही मोडतोड केली. त्यानंतर फिर्याद देण्यासाठी रमेश घोलप व त्यांचे नातेवाईक फलटण शहर पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या बाहेर रमेश घोलपचे दुसरे चुलतभाऊ सुनील रामचंद्र घोलपला पाच ते सहाजणांनी मारहाण करून जखमी केले. या घटनेनंतर दुसऱ्या गटाकडून तक्रार नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)

Web Title: The Phatton police beat up in front of the police station