सातारा सैनिक स्कूलचा टप्प्याटप्प्याने विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST2021-03-19T04:38:29+5:302021-03-19T04:38:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : येथील सैनिक स्कूल दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून उभे राहिले आहे. या सैनिक स्कूलच्या ...

Phase development of Satara Sainik School | सातारा सैनिक स्कूलचा टप्प्याटप्प्याने विकास

सातारा सैनिक स्कूलचा टप्प्याटप्प्याने विकास

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : येथील सैनिक स्कूल दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून उभे राहिले आहे. या सैनिक स्कूलच्या विकासकामांसाठी राज्य शासनाने ३०० कोटींची तरतूद केली आहे. या सैनिक स्कूलचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री यांनी गुरुवारी सैनिक स्कूलच्या पाहणीदरम्यान सांगितले.

या पाहणीप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, सातारा जिल्हा अधीक्षक अभियंता संजयकुमार मुनगीलवार, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, कार्यकारी अभियंता एस.पी. दराडे, सातारा सैनिक स्कूलचे प्राचार्य उज्ज्वल घोरमाडे, उपप्राचार्य बी. लक्ष्मीकांत, प्रशासकीय अधिकारी प्रमोद पाटील, सातारा सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी अमर जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, सैनिक स्कूलची स्थापना १९६१ साली झाली आहे. या शाळेचा परिसर ११५ एकर असून, या शाळेत ६३० विद्यार्थी शिकत आहेत. या सैनिक स्कूलमधील काही इमारती १९३२ व १९६२ या वर्षातील आहे. त्या आता जुन्या झाल्या आहेत. राज्य शासनाने सैनिक स्कूलच्या विकासासाठी ३०० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. या सैनिक स्कूलच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने विकासासाठी निधी उपलब्ध होणार आहे. त्या कामाला आता गती द्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.

यावेळी पालकमंत्री यांनी एनडीए ब्लॉक, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, डहाणूकर हॉल, कॅन्टीन, शाळेची मुख्य इमारतीबरोबर सैनिक स्कूलच्या मैदानाची पहाणी केली. त्यावेळी त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.

फोटो ओळ : सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये पालकमंत्र्यांनी गुरुवारी पाहणी केली.

Web Title: Phase development of Satara Sainik School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.