फलटणकरांंच्या समस्यांचे आता घरबसल्या निराकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST2021-01-08T06:05:44+5:302021-01-08T06:05:44+5:30

फलटण : फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘फलटण संवाद’ या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांनी हे अ‍ॅप ...

Phaltankar's problems are now solved at home | फलटणकरांंच्या समस्यांचे आता घरबसल्या निराकरण

फलटणकरांंच्या समस्यांचे आता घरबसल्या निराकरण

फलटण : फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘फलटण संवाद’ या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्याद्वारे आपले प्रश्न व समस्या मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, फलटण बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर व संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या संकल्पनेतून ‘फलटण संवाद’ या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांना घरी बसूनच आपली तक्रार अथवा समस्या ‘संवाद’ या अ‍ॅपद्वारे मांडता येणार आहे.

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असे स्पष्ट करून, नागरिकांना कधीही व कोठूनही आपली समस्या थेट मांडता येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी आपले प्रश्न व समस्या मांडण्यासाठी या अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहनही संजीवराजे यांनी नागरिकांना केले आहे.

Web Title: Phaltankar's problems are now solved at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.