फलटणमधील ‘तो’ खून अवघ्या १५०० रुपयांसाठी

By Admin | Updated: November 13, 2015 23:38 IST2015-11-13T22:34:27+5:302015-11-13T23:38:50+5:30

एकास अटक : ‘अ‍ॅट्रॉसिटी’ही दाखल; तपासाबाबत गोपनीयता

In Phaltan, he was murdered only for Rs 1,500 | फलटणमधील ‘तो’ खून अवघ्या १५०० रुपयांसाठी

फलटणमधील ‘तो’ खून अवघ्या १५०० रुपयांसाठी

फलटण : येथील मंगळवार पेठेतील अल्पवयीन मुलाचा खून अवघ्या १५०० रुपयांसाठी झाल्याची माहिती पुढे येत आहे. यासंदर्भात पोलिसांनी एकास अटक केली असली, तरी तपासाबाबत गोपनीयता बाळगली आहे. दरम्यान, या घटनेत ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
मंगळवार पेठेतील अनुराग सचिन अहिवळे या चौदा वर्षांच्या मुलाचा खून झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली होती. शिंदेवाडी (ता. फलटण) येथून फलटणकडे येत असताना श्रीराम सहकारी साखर कारखान्याजवळ असणाऱ्या झाडीत नेऊन अनुरागचा खून केल्याचे समोर आले होते. ही घटना मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास घडली होती.
अनुरागवर धारदार शस्त्राने वार केल्याचे उघड झाले असून, डोक्याला जबर मार बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अनुराग हा शिंदेवाडी येथील सविता रामचंद्र बनसोडे यांच्या घरातून फलटणकडे येत असताना ही घटना घडली होती. बनसोडे यांनीच घटनेची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली होती.
दरम्यान, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुरागच्या खिशात दीड हजार रुपये होते आणि ते हिसकावण्यासाठीच त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला गेल्याचे तपासात समोर येत आहे.
तसेच याप्रकरणात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानेही गूढ वाढले आहे. अटक केलेल्या संशयिताविषयीही पोलिसांनी गोपनीयता राखली आहे.
याबाबत फलटण शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तपासबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In Phaltan, he was murdered only for Rs 1,500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.