फलटणमध्ये ‘नृत्य अविष्कार’ला

By Admin | Updated: December 30, 2014 23:27 IST2014-12-30T21:57:59+5:302014-12-30T23:27:51+5:30

सखींकडून उत्स्फूर्त दाद

In the Phaltan, 'Dance' | फलटणमध्ये ‘नृत्य अविष्कार’ला

फलटणमध्ये ‘नृत्य अविष्कार’ला

फलटण : येथील लोकमत सखी मंचच्यावतीने ‘नृत्यअविष्कार’ या कार्यक्रमाचे आयोजन फलटण येथील सांस्कृतिक भवन, फलटण येथे केले होते. अजिंक्य कला निकेतन ग्रुप निर्मित नृत्यअविष्कार कार्यक्रमाला सखींनी टाळ्या, शिट्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मराठी लोककलेचा आगळा-वेगळा अविष्कार असलेल्या या नृत्य अविष्कार कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन फलटण येथील सर्व सखीमंच कार्यकारिणी सदस्या यांच्या हस्ते करून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये लोप पावत चाललेल्या मराठी लोककलेचे दर्शन सर्व सखींना झाले. अजिंक्य कला निकेतन ग्रुपने सादर केलेल्या दिंडी डान्सच्या माध्यमातून सर्व सखींनी पंढरीच्या विठ्ठल दिंडीचे दर्शन घेत टाळ्यांचा पाऊस पाडला.
वासुदेव गीताने जुन्या पहाटेची आठवण करून दिली. याचबरोबर कोळी नृत्य आणि कोळी समाजातील लग्नसोहळाही सादर करण्यात आला. त्यामध्ये सखींनी डान्सची साथ घेऊन लग्नसोहळ्यातील आपली उपस्थिती दर्शविली. धनगरी नृत्यामध्ये अजिंक्य लकडे यांनी अप्रतिम डान्स करून सर्वांची मने जिंकली. गोंधळ नृत्याच्या माध्यमातून सर्व सखी देवीची आराधना करण्यात गुंग झाल्या.
अशुतोष किर्तीकर याने सादर केलेल्या सोलो लावणीला सखींनी चांगला प्रतिसाद दिला. अन्य कलाकारांनी सादर केलेल्या आयटम साँगनेही धम्माल उडवून दिली.
स्रेहल रोकडे आणि आमृता कांबळे यांनी सादर केलेल्या ‘ही पोळी साजून तुपातली’ या गाण्यावर सखींनीही स्टेजवर जाऊन धम्माल उडवून देत डान्सचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमात अजिंक्य लकडे, केतन देशमुख, अभिजित वाघ, विशाल बेंद्रे, गोपाळ रावखंडे, काजल रोकडे, स्रेहल रोकडे, स्रेहल शिंदे, आमृता कांबळे, पूजा चव्हाण, निकिता कांबळे, अशुतोष किर्तीकर, निकिता कांबळे, स्रेहा काकडे या सर्व कलाकारांनी आपली कला सादर केली. लोकनृत्याची उपासना हिच आमची जोपासना असे ब्रीद वाक्य असणाऱ्या अजिंक्य कला निकेतन ग्रुपने लोककलेचा आगळा-वेगळा नृत्यअविष्कार सादर केला. (प्रतिनिधी)



या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजकत्व फलटण येथील प्रसिध्द जोशी हॉस्पिटल यांनी स्वीकारले होते. या कार्यक्रमामध्ये चंदूकाका सराफ यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या सुवर्ण नथीच्या प्रज्ञा प्रवीण शहा या मानकरी ठरल्या. यावेळी सखी ब्युटी पार्लरतर्फे फेशियलचा लकी ड्रॉ डाढण्यात आला.

Web Title: In the Phaltan, 'Dance'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.