पाळीव कुत्र्याची विष घालून हत्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST2021-09-02T05:25:46+5:302021-09-02T05:25:46+5:30
सातारा : फार्महाऊसमध्ये असलेल्या पाळीवर कुत्र्याची अज्ञाताने विष घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी सातारा तालुका ...

पाळीव कुत्र्याची विष घालून हत्त्या
सातारा : फार्महाऊसमध्ये असलेल्या पाळीवर कुत्र्याची अज्ञाताने विष घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सातारा तालुक्यातील निगुडमाळ येथे पुण्यातील चंद्रशेखर हुल्यारकर यांचे फार्महाऊस आहे. या फार्महाऊसमध्ये पाळीव कुत्रे होते. दि. ३० ऑगस्ट रोजी दुपारी हे कुत्रे अचानक गायब झाले. दुसऱ्या दिवशी या कुत्र्याचा मृतदेह निगुडमाळजवळील दाट झाडीमध्ये आढळून आला. या प्रकारानंतर फार्महाऊसवर असलेले सुपरवायझर शामसुंदर शर्मा यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. संबंधित पाळीव कुत्र्याची विष घालून हत्या केल्याचे पुढे आले. त्यानंतर पाळीव कुत्र्याचा मृतदेह गोडोलीमधील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आला. तिथे या कुत्र्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी कुत्र्याच्या पायावर जखमा आढळून आल्या. शवविच्छेदनानंतर नमुने पुणे येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नेमके कोणते विषारी औषध कुत्र्याला दिले, हे समोर येणार आहे.