जिद्द, चिकाटीच्या बळावर यश मिळवावे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST2021-02-09T04:41:19+5:302021-02-09T04:41:19+5:30

पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात भूगोलशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या ‘पदवीनंतरच्या रोजगार संधी आणि व्यवसाय मार्गदर्शन’ या कार्यशाळेत त्या बोलत ...

Perseverance, success on the strength of perseverance! | जिद्द, चिकाटीच्या बळावर यश मिळवावे !

जिद्द, चिकाटीच्या बळावर यश मिळवावे !

पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात भूगोलशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या ‘पदवीनंतरच्या रोजगार संधी आणि व्यवसाय मार्गदर्शन’ या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. प्राचार्य डॉ. एस. डी. पवार, जिमखाना उपाध्यक्ष व भूगोलशास्त्र विभागप्रमुख डॉ. माने, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. एन. जी. जाधव, प्रा. एस. पी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. एम. आर. सपकाळ म्हणाल्या, भूगोलशास्त्र विषयातून नोकरीच्या खूप संधी उपलब्ध आहेत. भूगोल शास्त्रातून जीआयएस, रिमोट सेन्सिंग, भूमी अभिलेख कार्यालय, हवामान, जीपीएस यांसारख्या विभागात तसेच राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विविध खात्यांत एमपीएससी, यूपीएससीच्या माध्यमातून नोकरी मिळू शकते. विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक संधी उपलब्ध आहेत.

यावेळी स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक प्रा. जाधव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. एस. पी. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

फोटो : ०८केआरडी०१

कॅप्शन : पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. एम. आर. सपकाळ यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Perseverance, success on the strength of perseverance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.