शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी लोकप्रतिनिधींनी राजीनामे द्यावेत : देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:36 AM2021-03-07T04:36:39+5:302021-03-07T04:36:39+5:30

सातारा : दिल्ली येथे १०० दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजीनामे द्यावेत, अशी ...

People's representatives should resign to support farmers: Deshpande | शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी लोकप्रतिनिधींनी राजीनामे द्यावेत : देशपांडे

शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी लोकप्रतिनिधींनी राजीनामे द्यावेत : देशपांडे

Next

सातारा : दिल्ली येथे १०० दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजीनामे द्यावेत, अशी मागणी लेक लाडकी अभियानाच्या प्रवर्तक ॲड. वर्षा देशपांडे यांनी केली आहे.

६ मार्च रोजी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. शासकीय कोविड १९ चे सर्व नियम पाळून मोदी, शहा, अंबानी, अदाणी यांच्या निषेधाच्या घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आपल्या रागाला वाट करून दिली. एमएसपीचा कायदा त्वरित पारित करा. शेतकरी आणि ग्राहकांचे शोषण करणारे तीनही काळे कायदे रद्द करण्याची मागणी केली. शेतकरीविरोधी सरकारची साथ सोडून देऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत लोकप्रतिनिधींनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी वर्षा देशपांडे यांनी संघटनेच्यावतीने केली.

यावेळी सुषमा घोरपडे, शैला जाधव, माया पवार, स्वाती बल्लाळ, मालन कांबळे, दत्ताजीराव जाधव, संजीव बोंडे आणि शेतकरी महिला उपस्थित होत्या.

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी ॲड. वर्षा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आंदोलन केले. (छाया : जावेद खान)

०६जावेद खान

Web Title: People's representatives should resign to support farmers: Deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.