महाबळेश्वरची लोकवस्ती रोगराईच्या विळख्यात

By Admin | Updated: September 25, 2014 23:23 IST2014-09-25T21:30:43+5:302014-09-25T23:23:13+5:30

पालिकेचे दुर्लक्ष : उपाययोजना आखण्याची नागरिकांची मागणी

The people of Mahabaleshwar know about the disease | महाबळेश्वरची लोकवस्ती रोगराईच्या विळख्यात

महाबळेश्वरची लोकवस्ती रोगराईच्या विळख्यात

महाबळेश्वर : रामगड येथील शिवसमर्थ गृहनिर्माण सोसायटीत नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयांमुळे स्थानिक लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पालिकेच्या मालकीचा सर्व्हे क्रमांक १५३/३ या मिळकतीत गेल्या २० वर्षांपासून नगरपालिकेची सार्वजनिक शौचालये आहेत. दोन वर्षांपूर्वी नगरपालिकेच्या वतीने जुनी शौचालये पाडून नवीन २४ शौचालये असलेली इमारत बांधण्यात आली. या जागेत ही इमारत ऐन लोकवस्तीमध्ये असून, मैला साठवणूक करून सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी जमिनी खाली टाकी न बांधता शौचालयांचा मैला काही अंतरावरच असणाऱ्या उघड्या गटारात सोडलेला आहे. या नजीकच शिवसमर्थ गृहनिर्माण सोसायटी आहे. गेली कित्येक वर्षे येथील नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागत आहे. या सदंर्भात वस्तीतील लोकांनी नगरपालिकेकडे वेळोवेळी तक्रारी केल्या. मात्र, कोणताही पाठपुरावा झाला नाही. कारवाईबाबत विचारणा केली असता याच वस्तीतील एक रहिवासी व्यक्ती या ठिकाणी बंदिस्त पाईपलाइन टाकण्यास मज्जाव करीत आहे, असे सांगण्यात येत आहे. चौकशीअंती हा व्यक्ती नगरपालिकेचाच सफाई कर्मचारी आहे, असे आढळून आले. ही जागा पालिकेच्या मालकीची असूनही संबंधित व्यक्ती या जागेवर हक्क प्रस्थापित करीत आहे. (प्रतिनिधी)

आरोग्याच्या प्रश्न गंभीर
सार्वजनिक शौचालयांचा मैला खुल्या जागेतून वाहून नेऊन जंगलात साडला जात आहे.गेली कित्येक वर्षे मोलमजुरी करून जगणाऱ्या १५० ते २०० लोकसंख्या असणाऱ्या या वस्तीच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून, याबाबत नगरपालिका प्रशासनाकडून ठोस कार्यवाही व्हावी, तसेच नागरिकांना आरोग्यदायी जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त करून द्यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Web Title: The people of Mahabaleshwar know about the disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.