आमदारांच्या चालकावरही दंडात्मक कारवाई !
By Admin | Updated: April 19, 2017 14:46 IST2017-04-19T14:46:08+5:302017-04-19T14:46:08+5:30
सातारा जिल्ह्यात दोन दिवसांमध्ये १८१ वाहनचालकांवर विविध कलमांखाली कारवाई

आमदारांच्या चालकावरही दंडात्मक कारवाई !
आॅनलाईन लोकमत
शिरवळ (जि. सातारा), दि. १९ : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशानुसार गेल्या दोन दिवसांपासून वाहनांची तपासणी सुरू आहे. यातून सर्वसामान्यांपासून आमदारांपर्यंत पोलिसांनी कोणालाच सोडले नाही.
पुणे जिल्ह्यातील एक आमदार साताऱ्याकडे येत होते. यावेळी त्यांच्या चालकाने सीटबेल्ट लावला नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी आमदारांची गाडी आडवून चालकावर दंडात्मक कारवाई केली.
शिरवळ पोलिसांनी राबिवलेल्या विशेष वाहन तपासणी मोहिमेत दोन दिवसांमध्ये सुमारे १८१ वाहनचालकांवर विविध कलमांखाली कारवाई करत छत्तीस हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केला . दरम्यान, या कारवाईमुळे बेशिस्त वाहन चालकांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)