महामार्गावर विनाहेल्मेटवाल्यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:12 AM2021-03-13T05:12:55+5:302021-03-13T05:12:55+5:30

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग वाढला आहे. तरीही अनेकजण विनाहेल्मेट वाहने चालवितात. त्यामुळे जीव धोक्यात येत असल्याने पोलिसांनी शुक्रवारी ...

Penalties for wearing helmets on highways | महामार्गावर विनाहेल्मेटवाल्यांना दंड

महामार्गावर विनाहेल्मेटवाल्यांना दंड

Next

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग वाढला आहे. तरीही अनेकजण विनाहेल्मेट वाहने चालवितात. त्यामुळे जीव धोक्यात येत असल्याने पोलिसांनी शुक्रवारी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई केली. (छाया : जावेद खान)

००००००

विजेच्या वापरात वाढ

सातारा : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने उकाडा जाणवायला लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात विजेचा वापर वाढला आहे. घर, कार्यालयात पंखे, वातानुकूलित यंत्रणा रात्रंदिवस सुरू राहते. त्यामुळे वीज बिल वाढवून मिळण्याची शक्यता आहे.

००

शहरातील बागा बंदच

सातारा : कोरोनाचा शिरकाव वाढत असल्याने शहरातील बागा, उद्याने पुन्हा बंद करण्यात आले आहेत. बागेत लहान मुलं खेळण्यासाठी येत असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या बागा पुन्हा बंद कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

००००००

एसटीची स्वच्छता

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव वाढत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण राहू नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीची नियमित स्वच्छता केली जाते. तसेच निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला जात आहे. संसर्ग टाळण्यास मदत होणार आहे. प्रवाशांनीही काळजी घेण्याची गरज आहे.

०००००००००

पाण्याला गळती

सातारा : साताऱ्यातील खालच्या रस्त्यावरील शेटे चौक परिसरात भूअंतर्गत अंथरलेल्या जलवाहिनीला शुक्रवारी रात्री गळती लागली होती. त्यामुळे पाणी बाहेर पडून वाहत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात होते. या ठिकाणची गळती काढण्याची मागणी केली जात आहे.

०००००००००

गतिरोधक हटविला

सातारा : साताऱ्यातील शेटेचौकात सुसाट गाड्यांना आवर घालण्यासाठी गतिरोधक स्थानिकांनी बनविला होता. तो धोकादायक होता. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत होते. तो हटविण्याची मागणी होत होती. एका रात्री तो गतिरोधक हटविण्यात आला आहे.

००००००

महादरे तलावातील पाणी पातळी घटली

सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागातील व्यंकटपुरा, चिमणपुरा, मंगळवार पेठेतील काही भागात महादरे तलावातून दुपारी पाणीपुरवठा केला जातो. या तलावात सध्या उन्हामुळे पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पाण्याचा नागरिकांनी जपून वापर केल्यास तसेच आठवड्यातून किमान दोन दिवस कपात करण्याची गरज आहे.

०००००००००

लसीकरणासाठी गर्दी

सातारा : कोरोनाचा शिरकाव होत असल्याने शासनातर्फे लस उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक पैसे खर्च करून लस घेण्याच्या मानसिकतेत असल्याने खासगी दवाखान्यात जाऊन चौकशी करतात.

०००००

जाळीवरून कचरा

सातारा : सातारा शहरातून ठिकठिकाणाहून ओढे वाहत आहेत. त्याच्या कडेलाच सदनिका आहेत. त्यामुळे अनेकजण कचरा ओढ्यात टाकत असतात. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. ओढे तुंबल्याने दुर्गंधी पसरते. पालिकेने संरक्षक जाळी बसविली आहे. मात्र त्यावरून कचरा टाकला जातो.

००००००

ओला-सुका एकत्र

सातारा : साताऱ्यातील गल्ली बोळातून घंटागाडीतून कचरा गोळा केला जातो. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा आणण्याबाबत पालिकेकडून वारंवार आवाहन केले जाते. मात्र तरीही असंख्य सातारकर प्लॅस्टिक पिशव्यांसह ओला कचरा टाकत असतात. त्यामुळे कचऱ्याचे विघटन करणे अवघड जात आहे.

००००००

धास्ती कायम

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसंदिवस वाढत आहे. विशेषत: ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये धास्ती वाढत आहे. याबाबत नागरिकांनी आता तरी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळून खबरदारी घेण्याची गरज आहे.

००००

रुग्णवाहिकेला न जागा

सातारा : सातारा शहरातून गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाहिकांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. मात्र सातारा मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अनेक दुचाकीस्वार रुग्णवाहिकेला जागा देत नाहीत. त्यामुळे मार्ग काढताना अडचण भासत आहे.

Web Title: Penalties for wearing helmets on highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.