‘पावसातला सह्याद्री’ कर्तृत्ववान व्यक्तींची ओळख करुन देणारे पुस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:38 IST2021-03-20T04:38:12+5:302021-03-20T04:38:12+5:30
मलकापूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे प्रदेश सरचिटणीस संजय पिसाळ, कराड दक्षिण ...

‘पावसातला सह्याद्री’ कर्तृत्ववान व्यक्तींची ओळख करुन देणारे पुस्तक
मलकापूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे प्रदेश सरचिटणीस संजय पिसाळ, कराड दक्षिण राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे अध्यक्ष विजय सुर्वे, कमलेश यादव, प्रदीप काकडे, एम. पी. फराळे, राजेंद्र पांढरपट्टे, ग्रंथपाल बापूराव चव्हाण, स्वाती घाटगे उपस्थित होते.
थोरात म्हणाले, मोबाईलच्या जमान्यात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. वाचन संस्कृती जोपासण्याचे काम वाचनालये करत आहेत. अशा या चळवळीत ग्रंथालयास मिळालेली ग्रंथ भेट अमूल्य असा ठेवा आहे. कर्तृत्ववान माणसाची ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून होते. असे ग्रंथ समाजातील तरुणांना दिशादर्शक, प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरतील.
एस.डी.खंडागळे यांनी आभार मानले.