कऱ्हाड नगरअभियंतापदी पाटील रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:43 IST2021-08-13T04:43:49+5:302021-08-13T04:43:49+5:30
येथील पालिकेचे नगरअभियंता एन. एस. पवार महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे महिनाभरापासून पालिकेचा बांधकाम विभाग प्रमुखाविना आहे. त्यातच उपअभियंत्यांचा ...

कऱ्हाड नगरअभियंतापदी पाटील रुजू
येथील पालिकेचे नगरअभियंता एन. एस. पवार महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे महिनाभरापासून पालिकेचा बांधकाम विभाग प्रमुखाविना आहे. त्यातच उपअभियंत्यांचा पेच निर्माण झाल्याने बांधकाम विभागाला कोणी वालीच नसल्याचे चित्र होते. बांधकाम विभागाला अधिकारी नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या दालनातूनच बांधकाम विभागाचा कारभार चालत होता.
नगर विकास विभागाने बुधवारी रात्री बदल्यांचे आदेश काढले. त्यामध्ये लोणावळा पालिकेत नगर अभियंता म्हणून कार्यरत असणारे एम. एच. पाटील यांची कऱ्हाडच्या नगर अभियंतापदी बदली करण्यात आली आहे. पाटील यांच्या बदलीने बांधकाम विभागातील कामाला गती प्राप्त होणार आहे.
फोटो
एम. एच. पाटील