पाटणला मेहुण्याचा गळा दाबून खून

By Admin | Updated: September 4, 2014 00:03 IST2014-09-03T23:49:39+5:302014-09-04T00:03:11+5:30

दमदाटी करीत मारहाण करायचा.

Patan's brother's blood thrills | पाटणला मेहुण्याचा गळा दाबून खून

पाटणला मेहुण्याचा गळा दाबून खून

पाटण : बहिणीला वारंवार मारहाण का करता, असा जाब विचारणाऱ्या मेहुण्याचा एकाने गळा दाबून खून केला. मंगळवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विलास विश्वास जाधव (वय २५, रा. विक्रमनगर, पाटण) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश परसू पवार (रा. विक्रमनगर, पाटण) याला अटक केली आहे. प्रकाश पवार हा पत्नी उमा हिच्यासह विक्रमनगरमध्ये राहतो. त्याच परिसरात उमाचा भाऊ विलास वास्तव्यास आहेत. प्रकाशला दारूचे व्यसन असून तो वारंवार उमाला शिवागाळ करायचा. तसेच दमदाटी करीत मारहाण करायचा. बहिणीला मारहाण केल्याबाबत तो प्रकाशला जाब विचारायचा. मंगळवारी सायंकाळी प्रकाशने उमाला मारहाण केली. या मारहाणीत ती जखमी झाल्यामुळे तिची आई तिला घेऊन उपचारार्थ ग्रामीण रूग्णालयाकडे गेली. त्यावेळी विलासही त्यांच्यासोबत होता. प्रकाश त्या ठिकाणी आला. विलासने त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी प्रकाशने विलासचा गळा दाबून खून केला. (प्रतिनिधी)

Web Title: Patan's brother's blood thrills