‘पाटबंधारे’च्या कर्मचाऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: April 18, 2017 23:06 IST2017-04-18T23:06:12+5:302017-04-18T23:06:12+5:30
‘पाटबंधारे’च्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

‘पाटबंधारे’च्या कर्मचाऱ्याची आत्महत्या
सातारा : येथील कृष्णानगरमधील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे शासकीय कार्यालयात एकच खळबळ उडाली.
दौलत रामचंद्र पांबरे (वय ४५, रा. धोम, ता. वाई, सध्या रा. कृष्णानगर एरिगेशन कॉलनी, सातारा) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दौलत पांबरे हे गेल्या अनेक वर्षांपासून कृष्णानगर येथील पाटबंधारे विभागात चौकीदार म्हणून काम पाहत होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी त्यांनी शासकीय कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार दुपारच्या सुमारास उघडकीस आला. त्यानंतर शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.शहर पोलिसांनाही या प्रकाराची माहिती देण्यात आली. पोलिसांनी पांबरे यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. या ठिकाणी त्यांचे नातेवाईक आल्यानंतर पांबरे यांनी आत्महत्या का केली, याची पोलिसांनी चौकशी केली. परंतु त्यांच्या आत्महत्येपाठीमागचे कारण पोलिसांनाही अद्याप समजले नाही. (प्रतिनिधी)