दुचाकीवरून प्रवाशांची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST2021-03-09T04:41:28+5:302021-03-09T04:41:28+5:30
कऱ्हाड : वारंवार मागणी तसेच आंदोलने करूनही केंद्र सरकार पेट्रोल तसेच डिझेलाची दरवाढ मागे घेत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या ...

दुचाकीवरून प्रवाशांची वाहतूक
कऱ्हाड : वारंवार मागणी तसेच आंदोलने करूनही केंद्र सरकार पेट्रोल तसेच डिझेलाची दरवाढ मागे घेत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या निषेधार्थ बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करीत अनोख्या पद्धतीने गांधीगिरी आंदोलन केले.
दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पेट्रोलची दरवाढ शंभर रुपयांपर्यंत गेली आहे. त्यामुळे प्रवास करणे अवघड झाले आहे. एसटी तसेच वडापसह खासगी वाहतूक करणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यामुळेच केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेत इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी आपल्या दुचाकीवर फलक लावत वडाप वाहतूक सुरू केली आहे. दुचाकीला ‘मोदी एक्स्प्रेस’ असा फलक लावून उंडाळे-कऱ्हाड-उंडाळे असा प्रवास पंचवीस रुपयात त्यांनी प्रवाशांसाठी केला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचाही फायदा होत आहे. अशाच पद्धतीने राज्यातील जनतेने आपल्या दुचाकीवरून बाहेरगावी जाताना दुचाकीवर डबल सीट घेऊन प्रवास करावा. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचा निम्मा खर्च वाचणार आहे, असेही पंजाबराव पाटील यांनी सांगितले आहे.
फोटो : ०८केआरडी०४
कॅप्शन : इंधर दरवाढीच्या निषेधार्थ कऱ्हाडात बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करून अनोखे आंदोलन केले.