वाहकाच्या हाताला चावा घेऊन प्रवासी पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:18 IST2017-12-04T00:17:41+5:302017-12-04T00:18:44+5:30

वाहकाच्या हाताला चावा घेऊन प्रवासी पळाला
गोडोली : एसटी तिकीट सवलतीसाठी प्रवासा दाखविलेले अपंगाचे प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे सांगून वाहकाने ते स्वत:कडे ठेवल्याचा राग मनात धरून प्रवाशाने वाहकाच्या हाताला चावा घेऊन पळ काढला. ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास पोवई नाक्यावर घडली.
सातारा बसस्थानकातून मिळालेली माहिती अशी की, भोईसर आगाराची एसटी बस ही कोल्हापूरहून भोरकडे निघाली होती. कºहाड बसस्थानकावर एका बसमध्ये एक प्रवासी बसला. त्याने वाहकाकडे साताºयाचे तिकीट मागून त्याच्याकडे असलेले अपंगाचे प्रमाणपत्र दाखवले. मात्र संबंधित प्रमाणपत्र बनावट असल्याचे वाहकाच्या निदर्शनास आल्याने वाहकाने ते प्रमाणपत्र स्वत:कडे ठेवून घेतले होते.
पोवई नाक्यावर बस येताच प्रवाशाने प्रमाणपत्र मागण्यास सुरुवात केली. मात्र, वाहकाने त्यास नकार दिल्याने चिडलेल्या प्रवाशाने वाहकाच्या हाताला चावा घेऊन पळ काढला. यामध्ये वाहक रमेश नारायण गुडे (वय ५५, रा. गुडे, ता. पाटण) यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला इजा झाली. वाहकाने जप्त केलेल्या त्या ओळखपत्रावर सोलापूर जिल्हा समाजकल्याण अधिकाºयांची सही, शिक्का आहे. संबंधित प्रवाशाचे नाव धीरज गंगाराम पाटील (रा. कर्णिकनगर, सोलापूर) असे त्या ओळखपत्रात नमूद केले आहे.
मोठे रॅकेट असल्याची शक्यता
धीरज पाटील या प्रवाशाकडे सापडलेले अपंग व पत्र आहे बनावट असून, या पाठीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता एसटीच्या अधिकाºयांनी वर्तवली आहे.