शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

पुसेगाव यात्रा : श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर ५६ लाख अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 16:00 IST

पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांचा रथोत्सव शुक्रवारी उत्साहात पार पडला. लाखो भाविकांनी रथावर तब्बल ५६ लाख १३ हजार ६४ रुपयांची देणगी अर्पण केली. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, नेपाळसह विविध देशांतील चलनांचा समावेश आहे. या रकमेत तुलनेने दहा रुपयांच्या नोटांची संख्या अधिक होती. यात्रा संक्रांतीपर्यंत सुरूच राहणार असल्याने देणगीच्या रकमेत वाढ होणार आहे.

ठळक मुद्देपुसेगाव यात्रा : श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर ५६ लाख अर्पणअमेरिका, इंग्लंड, भूतान, नेपाळ, कुवेत, दुबईसह विविध देशांतील परदेशी चलनांच्या नोटांचा समावेश

पुसेगाव : येथील सेवागिरी महाराजांचा रथोत्सव शुक्रवारी उत्साहात पार पडला. लाखो भाविकांनी रथावर तब्बल ५६ लाख १३ हजार ६४ रुपयांची देणगी अर्पण केली. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, नेपाळसह विविध देशांतील चलनांचा समावेश आहे. या रकमेत तुलनेने दहा रुपयांच्या नोटांची संख्या अधिक होती. यात्रा संक्रांतीपर्यंत सुरूच राहणार असल्याने देणगीच्या रकमेत वाढ होणार आहे.पुसेगावच्या श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त दाखल होणाऱ्या भक्तांच्या संख्येत वर्षांनुवर्षे लाखोंने वाढ होत आहे. यंदा लाखो भाविकांनी हजेरी लावून श्रीं रथावर मनोभावे १०, २०, ५०, १०० तसेच नव्या ५०० तसेच २,००० रुपयांच्या नोटांच्या माळा अर्पण केल्या.रथोत्सवादिवशी पहाटेपासूनच भाविकांची संख्या वाढत होती. रथपूजनासाठी मंदिर परिसरात उभ्या असलेल्या रथावर भाविकांनी नोटांच्या माळा अर्पण करण्यास सुरू केली होती. सकाळी अकरापासून गर्दीत वाढ होऊन बघता-बघता महाराजांचा रथ नोटांच्या माळांनी झाकाळून गेला. भाविकांनी आपापल्या परीने नोटांच्या माळा करून रथावर अर्पण केल्या.श्री सेवागिरी महाराजांचा रथ रात्री दहा वाजता मंदिरात पोहोचला. त्यानंतर रथावरून नोटांच्या माळा व परदेशी चलन काढून एकत्र करण्यात आले. पोलीस बंदोबस्तात ही रक्कम श्री नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेण्यात आली.

श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, रणधीर जाधव, सुरेश जाधव यांच्या देखरेखीखाली विविध वित्त संस्थांचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रथावरील देणगीची रक्कम मोजण्यात आली.

रात्री अकरा वाजता देणगीची रक्कम मोजण्यास प्रत्यक्ष प्रारंभ झाला. पहाटे चार वाजता देणगी रक्कम मोजण्याचे काम पूर्ण झाले. यामध्ये रथावर ५६ लाख १३ हजार ६४ रुपयांची देणगी अर्पण झाल्याचे स्पष्ट झाले.सातासमुद्रापारही लौकिकश्री सेवागिरी महाराजांचा लौकिक सातासमुद्रापार पसरत आहे. यावर्षी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावरील देणगी रकमेत भारतीय चलनाबरोबरच इतर देशांतील चलनी नोटा भक्तांनी रथावर अर्पण केल्या. यामध्ये परकीय चलनांचा समावेश आहे.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेSatara areaसातारा परिसर