पक्षाचं पद केवळ व्हिजिटिंग कार्ड छापण्यापुरतं नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:37 IST2021-03-25T04:37:13+5:302021-03-25T04:37:13+5:30
सातारा : ‘राजकीय पक्षाचं पद केवळ लेटर पॅड आणि व्हिजिटिंग कार्ड छापण्यापुरतं मर्यादित नाही, तर या पदाच्या माध्यमातून जनतेचे ...

पक्षाचं पद केवळ व्हिजिटिंग कार्ड छापण्यापुरतं नाही!
सातारा : ‘राजकीय पक्षाचं पद केवळ लेटर पॅड आणि व्हिजिटिंग कार्ड छापण्यापुरतं मर्यादित नाही, तर या पदाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवायचे असतात,’ असं स्पष्ट मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या सातारा जिल्हा आणि तालुका पदाधिकारी निवडी सोमवारी राष्ट्रवादी भवन सातारा येथे आ. शशिकांत शिंदे, विदयार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम, प्रदेश निरीक्षक अतुल शिंदे, गजेंद्र मुसळे, विभागीय उपाध्यक्ष सहर्ष घोलप, विनोद भांगे, जिल्हाध्यक्ष डॉ. वैभव कळसे यांच्या उपस्थितीत झाल्या.
यावेळी आ. शशिकांत शिंदे म्हणाले, संघटनेचं पद फक्त लेटर पॅड आणि व्हिजिटिंग कार्ड छापण्यापुरतं नसून, पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचं काम प्रत्येक पदाधिकाऱ्याने केले पाहिजे.
सुनील माने म्हणाले, जे पदाधिकारी नवीन नियुक्त झालेत, त्यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये आणि प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची शाखा स्थापन केली पाहिजे.
प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी प्रत्येक पदाची जबाबदारी सांगितली. तसेच जिल्हा कार्यकारिणीला तालुका निरीक्षणाची जबाबदारी देऊन तालुका पातळीवरही मुलाखत प्रक्रिया राबवून नवीन पदाधिकारी नियुक्तीच्या सूचना केल्या.
यावेळी जिल्हा उपाध्यक्षपदी सागर पवार, स्वप्निल डोंबे, अक्षय परदेशी, तन्मय कदम, श्रीधर कदम, सचिन जाधव यांची सातारा तालुका अध्यक्षपदी, शहराध्यक्षपदी अश्विन मस्के, सचिवपदी गौरव कासट, हर्षल भोईटे, कोरेगाव तालुकाध्यक्षपदी प्रथमेश पवार, कऱ्हाड दक्षिण अध्यक्षपदी अक्षय पाटील, फलटण तालुका अध्यक्षपदी अभिजित निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. प्रास्ताविक वैभव कळसे यांनी केले. प्रवीण यादव यांनी आभार मानले.
फोटो ओळ : सातारा येथील राष्ट्रवादी भवनात सोमवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.