खटावमध्ये दूध ओतून संपात सहभाग
By Admin | Updated: June 1, 2017 14:30 IST2017-06-01T14:30:42+5:302017-06-01T14:30:42+5:30
शेतमालाची विक्री न करण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा

खटावमध्ये दूध ओतून संपात सहभाग
आॅनलाईन लोकमत
खटाव (सातारा) , दि. 0१ : : शेतकरी संपाची पहिली ठिणगी खटावमध्ये पडली. येथील ग्रामपंचायत चौकामध्ये सकाळी शेतकरी तसेच त्यांच्या मुलांनी दुधाचा कॅन ओतून संपामध्ये शेतकरी सहभागी असल्याचे दाखवून दिले.
यावेळी गावाकडून शहरात फळ, भाजीपाला, दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तू न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही असा पवित्राही आता शेतकऱ्यांनी घेऊन त्या दिशेन पाऊल टाकले आहे. योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरु राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.