‘नो पार्किंग’मध्ये पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:15 IST2021-02-05T09:15:22+5:302021-02-05T09:15:22+5:30
प्रवासी, विद्यार्थी त्रस्त (फोटो : २७इन्फो०२) कऱ्हाड : येथील कऱ्हाड आगारातून सुटणाऱ्या बस वेळेवर सुटत नसल्याने याचा प्रवासी व ...

‘नो पार्किंग’मध्ये पार्किंग
प्रवासी, विद्यार्थी त्रस्त (फोटो : २७इन्फो०२)
कऱ्हाड : येथील कऱ्हाड आगारातून सुटणाऱ्या बस वेळेवर सुटत नसल्याने याचा प्रवासी व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांकडे एसटीचा मासिक पास असूनही खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बसफेऱ्या बंद होत्या. मात्र, सध्या फेऱ्या पूर्ववत होत असून वेळेनुसार बस सोडण्याची मागणी होत आहे.
कचऱ्याचे ढीग
कऱ्हाड : येथील अंतर्गत पेठांमधील चौकात कचºयाचे ढीग साचत आहेत. पालिकेची घंटागाडी सकाळी एकदाच येऊन गेल्यानंतर दिवसभर नागरिक चौकातील रस्त्याकडेला कचरा टाकत असून, त्यातून ढीग साचत आहे. याचा प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. पालिकेने याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांमधून होत आहे.
‘नो पार्किंग’मध्ये पार्किंग
कऱ्हाड : शहरात पालिका व वाहतूक शाखेतर्फे अनेक ठिकाणी नो पार्किंग झोनचे फलक लावले आहेत. मात्र, दुचाकी व चारचाकी वाहनधारक या नियमांचे सर्रास उल्लंघन करत असून, त्या ठिकाणी आपली वाहने पार्क करत आहेत. या नियमबाह्य पार्किंगमुळे अनेकवेळा वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.