शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

तेरा विद्यार्थ्यांच्या पालकांची पोलीस ठाण्यात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 15:19 IST

भिलार, ता. महाबळेश्वर येथील केंब्रिज शाळेतील १३ विद्यार्थ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून, संबंधित मुलांच्या पालकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव तक्रार देण्याचा पवित्रा घेतला आहे.

ठळक मुद्देतेरा विद्यार्थ्यांच्या पालकांची पोलीस ठाण्यात धावपालकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात तक्रार देण्याच्या पवित्रात

सातारा : भिलार, ता. महाबळेश्वर येथील केंब्रिज शाळेतील १३ विद्यार्थ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून, संबंधित मुलांच्या पालकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव तक्रार देण्याचा पवित्रा घेतला आहे.याबाबत अधिक माहिती अशी,भिलारमधील केंब्रिज शाळेतील १३ मुले अचानक बेपत्ता झाली होती. ती मुले पाचगणी पोलिसांना सापडल्यानंतर त्यांनी मुलांकडे प्राथमिक चौकशी केली. त्यावेळी शाळा प्रशासन मारहाण करते, जेवण देत नाही यासह अन्य तक्रारी करून पुन्हा शाळेत जाणार नसल्याचा त्यांनी पवित्रा घेतला.

घटनेचे गांभीर्य ओळखून पाचगणी पोलिसांनी त्या मुलांना साताऱ्यातील निरीक्षण गृहात सोडले. बाल कल्याण समितीने संबंधित मुलांचा जाबजबा घेऊन या प्रकाराची माहिती घेतली. आता या मुलांच्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात तक्रार देण्याच्या पवित्रा घेतला आहे. गुरुवारी रात्री बरेच पालक शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSchoolशाळाSatara areaसातारा परिसर