परमवीर सिंग यांचे बोलवते धनी वेगळेच : शशिकांत शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:37 IST2021-03-25T04:37:10+5:302021-03-25T04:37:10+5:30
सातारा : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या मालमत्ता चौकशीची मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी केलेली आहे. ...

परमवीर सिंग यांचे बोलवते धनी वेगळेच : शशिकांत शिंदे
सातारा : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या मालमत्ता चौकशीची मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी केलेली आहे. बदली होताच आरोप करणाऱ्या या अधिकाऱ्याचे बोलवते धनी वेगळेच आहेत, असा आरोपदेखील शशिकांत शिंदे यांनी केला आहे.
आमदार शिंदे म्हणाले, ‘बदली झाली की लगेच सिंग यांनी या बदलीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पाठीमागे बोलवते धनी वेगळेच आहेत. दिल्लीला गेल्यानंतर लगेच काही लोकांना बळ कसे येतं मला माहीत नाही. राज्य सरकारला अशाप्रकारे आव्हान करत असतील तर राज्य सरकारला माझी विनंती आहे की या आयपीएस आई अधिकाऱ्याने किती प्रॉपर्टी जमवली आहे याचा शोध घ्यावा. अधिकारी प्रामाणिकपणाने काम करत होते हेसुद्धा जगाला कळाले पाहिजे.’
आमदार शशिकांत शिंदे यांनी केलेल्या मागणीमुळे राजकारणी आणि अधिकारी यांच्यामध्ये निर्माण झालेल्या तणावाबाबत अनेक बाबी समोर येत आहेत. लोकनियुक्त पदाधिकारी शासन नियुक्त अधिकारी यांच्यातील वास्तव चित्र या चौकशीच्या निमित्ताने समोर येऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे.