शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील खड्ड्यांमध्ये सोडल्या कागदी होड्या!, आप'ने नोंदविला अनोखा निषेध

By सचिन काकडे | Updated: July 25, 2023 13:23 IST

खड्ड्यांचे ग्रहण अद्यापही सुटले नाही

सातारा : सातारा शहरातील अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले असून, ऐन पावसाळ्यात वाहनधारकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांची डागडुजी न करण्यात आल्याने मंगळवारी दुपारी आम आदमी पार्टीच्या वतीने या खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडून व वृक्षारोपण करून पालिकेच्या कारभाराचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला.सातारा पालिकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यांचे पावसापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अंतर्गत रस्त्यांना लागलेले खड्ड्यांचे ग्रहण अद्यापही सुटलेले नाही. पावसाळा सुरू झाल्यापासून या खड्ड्यांचे आकारमान वाढत चालले असून,  खड्ड्यांत वाहने आदळून वाहनचालक अक्षरश: हैराण झाले आहेत. शहरातील जुना आरटी चौक, तांदूळ आळी, फुटका तलाव परिसर, काळा दगड परिसर या भागात अशा खड्ड्यांची संख्या मोठी आहे. पालिकेने या खड्ड्यांची अद्याप डागडुजी न केल्याने मंगळवारी दुपारी आम आदमी पार्टीचे सागर भोगावकर व कार्यकर्त्यांनी जुना आरटीओ चौकातील खड्ड्यांत कागदी होड्या सोडून व वृक्षारोपण करून पालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदविला. या अनोख्या आंदोलनाची शहरात चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad transportरस्ते वाहतूकAAPआपagitationआंदोलन