शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

उंब्रज परिसरातील भाविकांची पंढरीची वारी

By admin | Updated: June 27, 2017 13:14 IST

सोहळ्यात ४०० जण सहभागी : संत सखूंच्या पादुका घेऊन मार्गस्थ

आॅनलाईन लोकमतउंब्रज (जि. सातारा), दि. २७ : संत सखू यांच्या पादुका रथात घेऊन विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या उंब्रज व परिसरातील वारकरी मंडळींनी उंब्रज ते पंढरपूर अशा पायी वारीस सुरुवात केली आहे. यामध्ये सुमारे ४०० भाविक सहभागी झाले आहेत. दि. २४ रोजी कऱ्हाड येथील संत सखू मंदिरातून पादुका रथातून उंब्रजला भैरवनाथ मंदिरात मुक्कामी आणण्यात आल्या. कृष्णा नदीत पादुकांना विधिवत स्नान घालण्यात आले. यानंतर दुपारी मृदुंग व टाळाच्या गजरात रथातून पालखी सोहळ्याने उंब्रजमधून प्रस्थान केले. सायंकाळी अंतवडी येथे पालखी सोहळा मुक्कामी होता. त्यानंतर रायगाव, म्हासुर्णे, चितळी, मायणी, विखळेफाटा, तसरवाडी, झरे, शेनवडी, दिघंची, शेरेवाडी, चिकमहूद, गाडीर्फाटा, वाखरी या ठिकाणी मुक्काम करून हा पालखी सोहळा पायी प्रवास आणि अखंड हरी नामाचा गजर करत सोमवार, दि. ३ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहचणार आहे. दि.४ जुलै रोजीला विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन बुधवार, दि. ५ जुलै रोजी पालखीचा परतीचा प्रवास सुरू राहणार आहे. उंब्रजच्या पायी वारी सोहळ्यास पंरपंरा होती. पण कारणास्तव ती काही काळ खंडित झाली होती. वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती हभप विठ्ठल महाराज यांच्या प्रेरणेतून सात वर्षांपूवी पुन्हा नव्या जोमाने उंब्रज ते पंढरपूर ही वारी सुरू झाली आहे. या सोहळ्यामध्ये हभप नामदेव आप्पा शामगावकर, इनामदार सर, पांडुरंग माळी मायणी, पांडुरंग महाराज म्हासुर्णेकर, रंगराव काळे, श्री दुगामार्ता भजनी मंडळ, संजय महाराज हे किर्तन व भजनाची सेवा करणार आहेत. या दिंडीला सात वर्षांपूर्वी सुरुवात झाली तेव्हा काही मोजकेच लोक या वारीत सहभागी होते. पण, कालांतराने सहभाग वाढत गेला. यावर्षी सुमारे ४०० च्या आसपास पुरुष व महिला, युवक, युवती या दिंडीत सहभागी झाले आहेत. अनेक सेवासुविधा या पायी दिंडीत पुरवल्या आहेत. वारकऱ्यांच्या साहित्यासाठी विशेष वाहनव्यवस्था, शुद्ध व मुबलक पाणी, आरोग्य सुविधा पुरवली जाणार आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी लागणारे कागद, गॅस सिलेंडर व उपयोगी वस्तू देऊन काहीजण वारीची सेवा बजावत असल्याचे दिंडी चालक, भैवनाथ मंडळाचे हभप रंगराव काळे यांनी सांगितले. दिंडी सोहळ्यामध्ये भक्तीबरोबरच अनेक सामाजिक प्रबोधनपर उपक्रम राबविले जातात. लेक वाचवा, वृक्ष लागवडीचे महत्त्व, व्यसनमुक्ती, पर्यावरणाचे महत्त्व आध्यात्मिक प्रकारे सांगितले जाते. मुक्कामाच्या ठिकाणी विविध मान्यवरांचे किर्तन व भजनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे दिंडी सचिव रामचंद्र घाडगे यांनी सांगितले.या पायी पालखी सोहळ्याच्या मार्गावर विसाव्याच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याची तयारी काही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. उंब्रज रोटरी क्लबचे अध्यक्ष सुधाकर जाधव, सचिव राजीव रावळ, सत्वशिल पाटील, दिलीपराज चव्हाण, फोटोग्राफर संघटनेचे रवींद्र साळुंखे, अमोल जाधव, रणजित पाटील, प्रदिप माळी आदी यासाठी प्रयत्नशील आहेत. दिंडी मार्गावर अनेक भाविकांकडून सकाळच्या व रात्रीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच यंदा प्रथमच २ लाख रुपये खर्च करून उंब्रजकरांनी पादुकांसाठी रथ तयार केला आहे.- राहुल जाधव, अध्यक्ष