पालखी मार्गाचे काम कासव गतीने, नागरिक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 02:05 PM2020-11-02T14:05:24+5:302020-11-02T14:08:07+5:30

padhrpur, Alandi, roadsefty, satara आळंदी-पंढरपूर-मोहोळ या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी महामार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे. यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. या कामाची गती न वाढल्यास १० नोव्हेंबर रोजी रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा बाधित शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

Palkhi route work at a snail's pace, citizens angry | पालखी मार्गाचे काम कासव गतीने, नागरिक संतप्त

पालखी मार्गाचे काम कासव गतीने, नागरिक संतप्त

googlenewsNext
ठळक मुद्दे पालखी मार्गाचे काम कासव गतीने, नागरिक संतप्तआळंदी-पंढरपूर-मोहोळ महत्त्वकांक्षी रस्त्यासाठी रास्ता रोकोचा इशारा

फलटण : आळंदी-पंढरपूर-मोहोळ या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी महामार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे. यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. या कामाची गती न वाढल्यास १० नोव्हेंबर रोजी रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा बाधित शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी महामार्गाच्या समन्वय समितीने फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांनी २६ मे २०१५ रोजी पालखी महामार्गाची अधिसूचना काढली होती.

फलटण तालुक्यातील २६ गावांतील ६४१८ शेतकऱ्यांची १००.३८ हेक्टर जमीन यासाठी संपादित होणार आहे. त्याशिवाय या क्षेत्रात येणारी राहती घरे, विहीर, बोअरवेल, गोठा, पत्राशेड, झाडे, हॉटेल, दुकाने व इतर उद्योग व्यवसाय बाधित होत आहेत, त्याची मोजदाद होणे बाकी आहे. संपादित जमीन नुकसान भरपाई वाटप जानेवारी २०२० मध्ये सुरू केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते जून कालावधित कामकाज बंद राहिले. त्यानंतर कामकाज सुरू झाले. परंतु भारत सरकारने मंजूर करूनही प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यात भरपाई मिळण्यात अडचणी येत आहेत. उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक १६ यांचे सातारा येथील कार्यालयामध्ये कायमस्वरुपी पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करावा. विद्यमान अधिकारी कार्यालयामध्ये पूर्णवेळ उपस्थित नसतात, त्यामुळे नुकसान भरपाई वितरण प्रक्रिया थंडावली आहे. फेर सर्व्हेक्षण व अवॉर्ड प्रसिद्ध होत नाहीत. भूसंपदनाशिवाय या क्षेत्रातील राहती घरे, विहीर, बोअरवेल, गोठा किंवा हॉटेल, दुकाने, उद्योग वगैरेंचे नुकसान भरपाईबाबत अवॉर्ड नोटीस संबंधित शेतकऱ्यांना मिळाली नाही.

ज्या संपादित जमिनींमध्ये मालक व कूळ, वाहिवाटदार यांना जमीन संपादन नुकसान भरपाई नोटीस मिळालेल्या नाहीत त्या मिळाव्यात, पूर्वीच्या अवॉर्डमध्ये एकत्रित नावाचा उल्लेख आहे, त्याऐवजी वैयक्तिक खातेदारानुसार वहिवाटीनुसार जेएमसीचा आधार घेऊन फेर नोटिसा काढा.

वास्तविक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ बाबत चौथा टप्पा धर्मपुरी ते बाळूपाटलाचीवाडी या कामाच्या निविदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यामार्फत प्रसिद्ध केली असताना बाधित शेतकऱ्यांपैकी ४० टक्के शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळाली नाही.

Web Title: Palkhi route work at a snail's pace, citizens angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.