चिले महाराजांचा पालखी सोहळा साध्या पद्धतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:19 IST2021-01-24T04:19:04+5:302021-01-24T04:19:04+5:30
फलटण : शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करून फक्त पाच भाविकांसमवेत पादुका सोहळ्याची अनेक वर्षांची परंपरा जपत सद्गुरू चिले महाराज ...

चिले महाराजांचा पालखी सोहळा साध्या पद्धतीने
फलटण : शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करून फक्त पाच भाविकांसमवेत पादुका सोहळ्याची अनेक वर्षांची परंपरा जपत सद्गुरू चिले महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दि. १५ रोजी जेऊर येथून प्रस्थान झाले. हा पायी पादुका सोहळा मोर्वे येथील श्री दत्त मंदिरात मंगळवार, दि. २६ रोजी येणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स, तोंडाला मास्क लावून, सॅनिटायझरचा वापर करत पालखी सोहळ्याची परंपरा जपण्यासाठी फक्त पाच भाविकांसमवेत दि. १५ जानेवारी रोजी जेऊर येथील मसाईदेवी, भैरवनाथ, चिले महाराज यांच्या मूर्तीला अभिषेक घालून पायी पादुका सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले होते. २६ रोजी श्री दत्त मंदिर संस्थान, मोर्वे येथे पायी पादुका सोहळा येत असून धार्मिक कार्यक्रमांशिवाय इतर सर्व कार्यक्रम देवस्थानने रद्द केलेले आहेत, याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थान, मोर्वे (ता खंडाळा) यांच्या वतीने करण्यात आले आहे.