पळशी ग्रामस्थांनी विरोधकांचे मनसुबे उधळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:38 IST2021-01-20T04:38:32+5:302021-01-20T04:38:32+5:30

औंध : खटाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या पळशी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी विरोधकांचे मनसुबे उधळून लावले, असे प्रतिपादन माजी आमदार प्रभाकर ...

Palashi villagers thwarted the opposition's intentions | पळशी ग्रामस्थांनी विरोधकांचे मनसुबे उधळले

पळशी ग्रामस्थांनी विरोधकांचे मनसुबे उधळले

औंध : खटाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या पळशी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी विरोधकांचे मनसुबे उधळून लावले, असे प्रतिपादन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले.

ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने मोठ्या मताधिक्याने आठ जागा जिंकल्या. घार्गे यांच्या विरुद्ध आमदार जयकुमार गोरे यांनी निवडणुकीत ताकद लावली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. केवळ विरोधासाठी बिनविरोध निवडणुकीला खीळ घालून काही अपप्रवृत्तींनी ग्रामस्थांवर निवडणूक लादली होती; परंतु पळशीकरांनी बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप खपवून न घेता कुणाच्या अामिषाला बळी न पडता निर्विवाद ग्रामपंचायतीची सत्ता सलग पाचव्यांदा आमच्या हाती दिली. गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकदिलाने काम केले जाईल, असा विश्वास प्रभाकर घार्गे यांनी व्यक्त केला.

या निवडणुकीत प्रकाश देशमुख, रेश्मा निकम, शकुंतला पवार, संतोष कुकले, रंगनाथ पवार, सिंधू निंबाळकर, रेश्मा राऊत, रोहिणी पाटील यांनी विजय मिळवला.

फोटो : पळशी ग्रामपंचायतीत मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. (छाया : रशिद शेख)औंध : खटाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या पळशी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी विरोधकांचे मनसुबे उधळून लावले, असे प्रतिपादन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले.

फोटो : पळशी ग्रामपंचायतीत मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. (छाया : रशिद शेख)

Web Title: Palashi villagers thwarted the opposition's intentions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.