पोपट माने ।लोकमत न्यूज नेटवर्कतळमावले : जन्म झाल्यापासून दोन्ही डोळ्यांना दिसत नसताना देखील निगडे, ता. पाटण येथील २८ वर्षीय युवक भरत कदम किराणा मालाचे दुकान व्यवस्थितपणे चालवत आहे. ग्राहकांनी दिलेले पैसे नोटा, नानी हाताच्या स्पर्शाने बरोबर ओळखत आहे ...
वाई : ऐतिहासिक, सांकृतिक महत्त्व लाभलेली वाई येथील कृष्णानदी कचरामुक्त व जलपर्णीमुक्त करण्याचा निर्धार पालिका व स्वयंसेवी संघटनांनी केला आहे. स्वयंसेवकांकडून दर रविवारी कृष्णा घाटावर राबविल्या जाणाऱ्या स्वच्छता मोहिमेमुळे नदीचे रुपडे बदलू लागले आहे. ...
सातारा : मोक्कांतर्गत दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी आलेल्या पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा गुंड दत्ता जाधवने गळा दाबल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी रात्री प्रतापसिंहनगरात ही घटना घडली होती. ...
महाबळेश्वर : ‘पुस्तकांचे गाव म्हणून भिलार हे देशात प्रसिद्ध होत आहे. भिलारप्रमाणेच ‘पुस्तकांचे गाव’ हा प्रकल्प राज्यातील अनेक गावांत राबविला तर भविष्यात महाराष्ट्र हे पुस्तकांच्या गावाचे राज्य म्हणून अल्पावधीत नावारुपास येईल,’ ...
सातारा : सांगली पोलिसांच्या पथकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंड दत्ता जाधवला अखेर शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. तब्बल अडीच किलोमीटर चालत भर रस्त्यातून त्याची पोलीस ठाण्यापर्यंत वरात ...
फलटण : पाणी टंचाईवर मात करण्याच्या निर्धाराने तिरकवाडी (ता. फलटण) येथील तरुणाईने एकत्रित येत वॉटर कपच्या धर्तीवर श्रमदान केले. येथील पाझर तलावाची खोली व रुंदीकरण केल्याने या तलावातील पाणी साठवण क्षमता ६ लाख ३० हजार लिटरने वाढणार आहे. दरम्यान, पुढील क ...
पिंपोडे बुद्रुक : गेले जवळपास दोन वर्षे किमान पातळीवर राहिलेल्या आल्याच्या दरात झालेली उच्चांकी वाढ पाहता आल्याच्या दरातील तेजीने शेतकऱ्यांच्या चेहºयावरदेखील तेजी आल्याचे पाहावयास मिळत आहे. ...
लग्न ठरत नसल्याने आलेल्या नैराश्येतून वाई तालुक्यातील बदेवाडी येथील एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन नामदेव शेंडगे (वय २८) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. ...
पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर येथील अजंठा चौकात कंटेनरला टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोनजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला.जखमींवर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...