राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याची भाषा वापरणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचं व त्यांच्या पक्षाचं कर्तुत्व काय?, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी मंत्री पाटील यांच्या वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला. सातारा येथ ...
काटवलीची वाटचाल स्मार्ट ग्रामकडे चालली असून ग्रामपंचायत, विद्यार्थी व युवकांनी प्लास्टिक बंदीचा नारा देत पर्यावरण वाचविण्याचा संकल्प केला. याच माध्यमातून प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी जनजागरण रॅली काढण्यात आली. यावेळी घरोघरी जाऊन प्लास्टिक पिशव् ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा हद्दीतील एका हॉटेलसमोर कृष्णा खोरे पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यावर शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी चाकू हल्ला करून जखमी केले. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली. ...
भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी कऱ्हाड दक्षिणचा दौरा केला. त्यांचा हा दौरा त्यांनी जरा उरकताच घेतला. त्यामुळे रात्री एका सभागृहात आयोजित केलेला संवाद मेळावा ...
फेब्रुवारी २०१८ ते आजअखेर न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडी कारखान्याने ऊस उत्पादक शेतकºयांचे अंदाजे ५१ कोटी रुपये न दिल्याप्रकरणी कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांच्या ...
गुणवत्तावाढ व विद्यार्थ्यांना शिक्षणाचं नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी देशातील टॉप २९ महाविद्यालयांना प्रत्येकी पाच कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. ...
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत पुसेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने खटाव, खातगुण, काटकरवाडी व पुसेगाव येथे चार डीजे व इतर साहित्य सील करण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईने डीजे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
राज्यात सर्वाधिक अवजड वाहतूक होत असलेल्या सातारा-लोणंद राज्यमार्गावरील पावसाळ्यात पडलेले मोठमोठे खड्डे मुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आता रस्त्याकडेला असलेल्या काळ्या मातीचा वापर केला जात आहे. यामुळे या रस्त्याची आता माती झा ...
रस्त्यावर अपघात किंवा भांडणे सुरू असल्यास अनेकजण कानाडोळा करून पुढे जातात. आपले काहीच देणे-घेणे नाही, असे समजून अनेकजण त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचे आजूबाजूला आपल्याला पाहिला मिळते. परंतु साताऱ्यातील एक आजोबा याला अपवाद ठरले आहेत. ...